श्रीगोंदा । नगर सह्याद्री
श्रीगोंदा तालुक्यातील नागरिकांनी प्रशासनाच्या विरोधात रविवार दि. २६ जानेवारी रोजी उपोषण आंदोलन केले. यावेळी उपस्थित महिलांनी चोरांना सोडले तसे अत्याचारातील आरोपींना सोडणार का? असा सवाल पोलीस प्रशासनाला केला. प्रजासत्ताक दिनी केलेलया उपोषण आदोलंनाने सर्वांचे लक्ष वेधले. प्रशासनाच्या वतीने कारवाईचे आश्वासन देण्यात आल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
संभाजी बिग्रेड सामाजिक संघटना तसेच युवराज विठ्ठल पळसकर यांनी प्रजासत्ताक दिनी प्रशासनाच्या विरोधात उपोषण व आंदोलन केले. श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे श्रीगोंद्यात रुजू झाल्यापासून वादाच्या भोवऱ्यात दिसत आहेत. गुन्हेगाराची पाठराखण करत तक्रारदारास घरचा रस्ता दाखवणारे पोलीस निरीक्षकांनी अवैध धंद्यावाल्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत आहे. शेळी चोरणाऱ्या चोरास अटक न करता सोडून देणारे किरण शिंदे महिलांवर जर अत्याचार झाले तर शेळी चोराप्रमाणे सोडून देणार का असा सवाल करत श्रीगोंदा पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामध्ये अवैध वेश्या व्यवसाय, कॅफे व्यवसाय, दारू व ताडी व्यवसाय, मटका व जुगार इतर अवैध व्यवसाय रोखण्यामध्ये पोलीस अधिकारी अपयशी ठरले असल्याचा आरोप आदोलंनकर्त्यांनी केला आहे.
सायकर परिवारावर तसेच शेळके परिवारावर चाकू हल्ला करणाऱ्या आरोपीला ३०७ गुन्हा दाखल करावा.पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांचे यांच्या कॉलची सीडीआर तसेच एफ आय आर नोंदवणारे पोलीस कॉन्स्टेबल यांचेही फोन रेकॉर्डिंग डिटेल माहिती मिळावी.आरोपीला वाचवणारे पोलीस निरीक्षक किरण शिंदे व कॉन्स्टेबल गाडगे यांचे तात्काळ निलंबित करावे. २४ जानेवारी रात्री दोन ते दुपारी दोन पर्यंत श्रीगोंदा पोलीस स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासावे, श्रीगोंदा तालुक्यामध्ये अवैद्य व्यवसाय तातडीने बंद करावेत.सहा महिने झाले तरी गुन्हेगार पकडलेले नाही. त्यांच्यावर झालेली कारवाई याविषयी माहिती मिळावी अशी मागणी आदोलंनकर्त्यांनी केली आहे.
प्रजासत्ताक दिनी प्रशासनातील जबाबदार अधिकाराच्या विरोधात आंदोलन करण्याची वेळ येत आहे. खरंतर ही निषेधार्थ बाब आहे. श्रीगोद्यांत अवैध धंदे जोरदार सुरु आहे. श्रीगोंदा तालुक्याला कर्तव्यदक्ष अधिकारी लाभावे यासाठी आमदार विक्रम पाचपुते यांच्याकडे मागणी करणार असल्याचे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे यांनी बोलतांना सांगितले. यावेळी टिळक भोस यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे, प्रदेश उपाध्यक्ष संग्राम देशमुख, जिल्हा उपध्यक्ष नानाजी शिंदे, जिल्हा कार्याध्यक्ष सुनील ढवळे, सुमित बोरुडे, गणेश पारे, युवराज विठ्ठल पळसकर यांच्यासह संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.