spot_img
महाराष्ट्रदेवेंद्र फडणवीस यांच्या पाठोपाठ 'तो' नेता 'पुन्हा येणार'? पुन्हा मोठी जबाबदारी मिळणार..

देवेंद्र फडणवीस यांच्या पाठोपाठ ‘तो’ नेता ‘पुन्हा येणार’? पुन्हा मोठी जबाबदारी मिळणार..

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री:-
राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलेलं आहे. देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेले आहेत. तर अजित पवार, एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे. मागील विधानसभा निवडणुकीवेळी देवेंद्र फडणवीस ‘मी पुन्हा येईन’ म्हणाले होते. प्रचारसभांमधील अनेक भाषणांमध्ये ते पुन्हा येईन असं ठासून सांगत होते. पण निकालानंतर नाट्यमय घडामोडी घडल्या. शिवसेना, भाजपची युती तुटली आणि फडणवीस यांची संधी हुकली. पण आता फडणवीस पुन्हा आले होते. त्यामुळे ५ वर्षांपूर्वीचे त्यांचे शब्द खरे ठरले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांच्या पाठोपाठ आणखी एक नेता पुन्हा येण्याची शक्यता आहे. भाजपकडून मंत्रिपदांसाठी ढिगभर नावांची चर्चा आहे. भाजपला २०१९ मध्ये १०५ जागा मिळाल्या. पण अडीच वर्ष पक्षाला विरोधी बाकांवर बसावं लागलं. २०२४ मध्ये सत्ता आली. पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यांच्या मंत्रिमंडळात भाजपचे केवळ नऊ जण होते. त्यामुळे अनेकांना मंत्रिपदाची संधी मिळाली नाही. आता ही सगळी आमदार मंडळी मंत्रिपदासाठी उत्सुक आहेत.

दुसरीकडे विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर यांचं नाव चर्चेत आहे. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर प्रकरण निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालयात गेलं. त्यानंतर अपात्रतेचा विषय विधानसभा अध्यक्षांकडे आला. त्यावर नार्वेकर यांनी निर्णय घेतला. त्यांनी सेनेच्या दोन्ही गटांना अपात्र ठरवलं नाही. त्यांच्या निर्णयाची बरीच चर्चा झाली. महाविकास आघाडी सरकार कोसळलं, त्यावेळी विधानसभा अध्यक्षपद रिक्त होतं. त्याचा फटका महाविकास आघाडीला बसला. यामुळे विधानसभा अध्यक्षाची भूमिका किती महत्त्वाची असते ही बाब अधोरेखित झाली.

विधानसभा अध्यक्षपद भाजप स्वत:कडे ठेवणार आहे. या पदावर पुन्हा एकदा राहुल नार्वेकर यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. राहुल नार्वेकर सलग दुसऱ्यांदा कुलाबा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस असा प्रवास करत ते २०१९ मध्ये भाजपमध्ये दाखल झाले. त्यानंतर पक्षानं त्यांना कुलाबा मतदारसंघातून तिकीट दिलं. त्यांनी विधानसभा निवडणूक जिंकली. ३ जुलै २०२२ रोजी ते विधानसभेचे अध्यक्ष झाले. त्यावेळी त्यांचं वय केवळ ४५ वर्षे होतं. देशातील सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष होण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सरपंच देशमुख यांच्या मारेकऱ्यांना सोडू नका; मंत्री धनंजय मुंडे नेमकं काय म्हणाले?

Politics News: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. यामध्ये धनजंय...

साई बाबांच्या शिर्डीत भक्तांची फसवणूक; गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?

शिर्डी । नगर सहयाद्री:- भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या साई बाबांच्या शिर्डीत भक्तांची फसवणूक होत असल्याचा...

‘पारनेरला शनिवारी राष्ट्रवादीचा मेळावा’; कोण राहणार उपस्थित?

तालुकाध्यक्ष विक्रम कळमकर यांची माहिती पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या...

‘कष्टाचे दाम मिळविण्यासाठी बळीराजाचा संघर्ष’

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:- श्रीगोंदा तालुक्यातील बाजारात भाज्यांचे दर कमी झाल्याने सर्वसामान्य समाधान व्यक्त करत...