spot_img
अहमदनगरशरद पवार, राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र येणार?; सुप्रिया सुळेंनी दिली महत्त्वाची...

शरद पवार, राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र येणार?; सुप्रिया सुळेंनी दिली महत्त्वाची माहिती

spot_img

मुंबई | नगर सह्याद्री प्रतिनिधी
मराठी भाषेच्या समर्थनार्थ आणि शालेय अभ्यासक्रमात हिंदी सक्तीविरोधात ५ जुलै २०२५ रोजी मुंबईत मोठा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येणार आहेत, अशी माहिती आधीच समोर आली आहे. आता या मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांचा पाठिंबाही मिळाल्याने चर्चांना नवा उधाण आलं आहे. शरद पवार स्वतः या मोर्चात सहभागी होणार का? असा प्रश्न उपस्थित झाला असून, यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मराठी भाषेबाबत आपल्याला गांभीर्याने विचार करायला हवा. मी स्वतः एसएससी बोर्डाची विद्यार्थीनी आहे आणि या बोर्डाला देशभरात मान्यता आहे. मात्र शिक्षणव्यवस्थेवर हिंदी लादली जात असेल, तर त्याविरोधात आवाज उठवणं गरजेचं आहे,” असं मत सुप्रिया सुळेंनी व्यक्त केलं. तसंच, ५ जुलैच्या मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पूर्ण ताकदीने सहभागी होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. “शरद पवार सहभागी होतील का? याबाबत निर्णय अजून झाला नाही. त्याबाबत आज-उद्या स्पष्टता येईल असंही त्यांनी सांगितलं. याबाबत जयंत पाटील अधिक माहिती देतील, असं त्यांनी स्पष्ट केलं.

प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतूनच व्हावं, हीच जनतेची आणि आमची भूमिका आहे. हिंदी शिकण्यास कोणी विरोध करत नाही, पण मातृभाषेला डावलणं कदापि मान्य नाही,” असंही सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केलं .५ जुलै २०२५ रोजी मराठीप्रेमी नागरिक, विविध संघटना, कलाकार, साहित्यिक आणि आता राजकीय पक्षही एकत्र येत आहेत. या मोर्चात राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे एकत्र दिसणार असून, शरद पवार सहभागी होतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सोशल मीडियावर पत्र जारी
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोशल मीडियावर पत्र जारी करत पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे. पत्रात म्हटले आहे की, “महाराष्ट्रहिताचा प्रश्न असेल तेव्हा महाराष्ट्रासाठी, राष्ट्रहिताचा प्रश्न असेल तेव्हा राष्ट्रासाठी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून उभं राहणं हेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांचे धोरण आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आरक्षण जाहीर; संभाव्य उमेदवार लागले तयारीला!

आ. संग्राम जगताप आणि डॉ. सुजय विखे पाटील यांची सहमती एक्सप्रेस नगर महापालिकेत विरोधकांना...

महाराष्ट्रात हुडहुडी! विदर्भ – मराठवाड्यात कडाक्याची थंडी, पुढील 4 दिवस तापमान कसे राहणार?

मुंबई / नगर सह्याद्री - Weather Update: देशभरात सध्या हवामान वेगाने बदलताना दिसतंय ....

निवडणुकीच्या तोंडावर उबाठा शिवसेनेत फेरबदल; जिल्हाप्रमुखपदी कुणाची निवड?

लोकसभा संघटकपदी गाडे, दक्षिण जिल्हाप्रमुखपदी दळवी, महानगर प्रमुखपदी काळे यांच्या निवडी अहिल्यानगर | नगर सह्याद्री शिवसेना...

पारनेर नगराध्यक्षपदाच्या निवडीत दडपशाही; महायुतीचे पत्रकार परिषदेत आरोप, हंगा वरून कारभार पाहणाऱ्यांना धडा शिकवणार!

पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर नगराध्यक्ष पदाच्या निवडीत महायुती व महाविकास आघाडीमध्ये चांगलाच कलगीतुरा...