spot_img
अहमदनगरनगरमध्ये मराठा वादळं धडकणार; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

नगरमध्ये मराठा वादळं धडकणार; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

spot_img

मनोज जरांगे पाटलांची सोमवारी नगरमध्ये शांतता रॅली | शहर व उपनगरांतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
अहमदनगर | नगर सह्याद्री

मनोज जरांगे यांची शांतता रॅली सोमवारी (दि.१२) नगर शहरात दाखल होणार आहे. या पार्श्वभूमीवर नगर शहरासह उपनगरातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. रॅलीमुळे होणार्‍या गर्दीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, म्हणून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून आजच्या दिवसाची तासिका इतर दिवशी भरून काढावीत, असेही आदेशात म्हटले आहे. दरम्यान चौपाटी करंजा परिसरातील समारोप स्थळांची पाहणी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी केली.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली सोमवारी (१२ ऑगस्ट) नगर शहरात येत आहेत. केडगाव येथे नगर शहरात रॅलीचे स्वागत होणार आहे. तेथून माळीवाडा बस स्थानक परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून शहरात रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीला मोठी गर्दी होण्याची शयता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर नगरच्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शहरात सुमारे साडेसहा किमीचे अंतर कापत चौपाटी कारंजा येथे सांगता होणार आहे. सुमारे पाच हजार स्वयंसेवक नियोजन व व्यवस्था करत आहेत. जरांगे पाटील पुण्याहून नगरकडे येणार आहेत. नगरच्या अखंड समाजाच्या वतीने बेलवंडी फाटा येथे जिल्ह्यात त्यांचे स्वागत होईल. तेथून सुमारे चारशे चारचाकी व एक हजार दुचाकी त्यांच्या यात्रेत सहभागी होतील. नगरकडे येताना सुपा येथेही स्वागत होईल व तेथून केडगाव येथे शहरात स्वागत होईल. रेल्वे उड्डाणपुलाजवळ नेमाने इस्टेटच्या मैदानावर वाहने लावून रॅली शहरात प्रवेश करेल. शहरात महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करून चौपाटी कारंजा येथे रॅलीची सांगता होईल.

नगर जिल्ह्यासह शेजारील बीड, सोलापूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नाशिक जिल्ह्यातून लाखो समाजबांधव शहराच्या रॅलीत सहभागी होणार आहेत. त्यांच्यासाठी पाणी व फूड पॅकेटची व्यवस्था करण्यात येत आहे. ज्यांना सेवा, सुविधा पुरवायची आहे, त्यांनी रॅली मार्गावर पुरवावी, असे आवाहन अखंड मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

अशी आहे पार्किंगची व्यवस्था
केडगाव येथे नेमाने इस्टेट, कल्याण रस्त्यावर फटका मार्केट भरणारी जागा, शहरात लेरा ब्रूस मैदान न्यू आर्टस् कॉलेज, सावेडीत सारडा कॉलेज अशा विविध ठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. यासह अनेक ठिकाणी शहरात येणार्‍या महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या जागांवर पार्किंग करण्यात येणार असल्याचे दळवी यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कारागृहातून आरोपीने पाठवले साक्षीदाराला धमकीचे पत्र; वाचा अहिल्यानगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील साई कॉलनी परिसरात साक्षीदाराला पत्राद्वारे धमकी दिल्याचा प्रकार घडला....

पुण्यात नात्यांमध्येच रक्तरंजित थरार; आयुषच्या हत्येची धक्कादायक माहिती उजेडात

पुणे / नगर सह्याद्री - पुणे शहरातील नाना पेठ परिसरामध्ये झालेल्या आयुष कोमकर हत्या प्रकरणातील...

शहरात साहित्योत्सव रंगणार; संमेलनाची तयारी पूर्ण, ११, १२ सप्टेंबरला भरगच्च कार्यक्रम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- पुणे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सावेडी उपनगर शाखा आयोजित राज्यस्तरीय युवा साहित्य...

शासन निर्णय मागे घेण्याची आवश्यकता नाही!; मंत्री विखे पाटील

मंत्री छगन भुजबळ यांची मागणी फेटाळली मुंबई । नगर सहयाद्री:- मराठा आरक्षणाच्या संदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीने...