शहराच्या डीप लीन स्वच्छतेसाठी घेतली आक्रमक भूमिका
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
आ.संग्राम जगताप यांनी शहराच्या स्वच्छतेसाठी आग्रही व आक्रमक भूमिका घेतली आहे. गेल्या तीन दिवसापासून शहराच्या स्वच्छतेकडे आ.जगताप जातीने लक्ष घालत रस्त्यावर उतरले आहेत. आ.संग्राम जगताप यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे महानगरपालिका प्रशासनही खडबडून जागे झाले असून शहराच्या स्वच्छतेसाठी डीप लीन मोहीम राबवत आहे. जोवर संपूर्ण नगर शहर स्वच्छ व सुंदर होणार नाही तोवर मी स्वस्थ बसणार नाही; असा पावित्रा आ.संग्राम जगताप यांनी घेतला आहे.
शहराच्या डीप लीन स्वच्छता मोहिमे अंतर्गत आ.संग्राम जगताप यांनी शनिवारी सकाळी ७ वाजताच सावेडी मधील माऊली सभागृह, मॅककेअर हॉस्पिटल ते नव्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जणार्या रस्त्याची पाहणी केली. यावेळी उपस्थित महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे व अधिकार्यांना शहराच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष न करता दरोरज डीप लीन मोहीम राबवण्याच्या सूचना आ.जगताप यांनी केल्या. तसेच यावेळी उपस्थित हायजीन फर्स्टच्या संचालिका वैशाली गांधी यांनीही स्वच्छतेच्या उपाययोजनांवर आ.संग्राम जगताप व अधिकार्यांशी चर्चा करून महत्वच्या टिप्स दिल्या.
यावेळी आ.संग्राम जगताप यांनी आक्रमक व आग्रही भूमिका घेत या परिसरातील रस्त्याची स्वच्छता मनपाच्या कर्मचार्यांना करायला लावली. रस्त्याच्या दुतर्फा वाढलेले गवत, नाल्यातील गाळ, चिखल व माती तात्काळ काढण्याचे आदेश देत तेथे थांबून स्वच्छता करून घेतली. मॅककेअर हॉस्पिटल परिसरातील बेशिस्त व अनधिकृत पार्किंग व अस्वच्छते बाबत आ.जगताप यांनी नाराजी व्यक्त करत तेथील चारचाकी व दुचाकी गाड्यांवर त्वरित कारवाई करण्याचे निर्देश दिले. तसेच हॉस्पिटलला नोटीस बजावण्यास सांगितले. यावेळी उपायुक्त संतोष टेंगेळे यांनी स्वतः कारवाई करून काही दुचाकी वाहने उचलून टॉइंग व्हॅनमध्ये ठेवली. तसेच परिसरातील अस्ताव्यस्त वाढलेल्या झाडांच्या फांद्या छाटण्याच्या सूचना आ. जगताप यांनी पाहणीदरम्यान दिल्या.
आ.संग्राम जगताप यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे शहराची स्वच्छतेकडे वाटचाल होत असून परिसर कधी नव्हेतर चकाचक होत असल्याच्या भावना परिसरातील रहिवाश्यांनी व्यक्त करत मोठे समाधान व आनंद व्यक्त करून आ.जगताप यांचे आभार मानले. यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे, उपायुक्त संतोष टेंगेळे, शहर अभियंता मनोज पारखे, घनकचरा विभागप्रमुख अशोक साबळे आदींसह परिसरातील नागरिक व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
कामचुकार कर्मचार्यांवर कडक कारवाई करा
शहरातील बहुतांशी भागातील रस्त्यांचे काँक्रीटीकरणाचे कामे पूर्णत्वास आले आहेत. या रस्त्यांमुळे नगर शहराचा चेहरामोहरा बदलला असून वेगळी ओळख निर्माण होत आहे. शहरातील रस्ते आता चांगले व दर्जेदार झाले असले तरी सर्वत्र मोठ्याप्रमाणात स्वच्छता व कचरा दिसत आहे. हे चित्र शहराच्या सौदर्याला बाधा आणणारे आहे. त्यामुळे आपल्या शहराप्रती अभिमान बाळगून सर्व नागरिकांनी नगर शहर कायम कसे स्वच्छ व सुंदर राहील यासाठी प्रशासनास सहकार्य करावे. जोवर पूर्ण नगर शहर स्वच्छ व सुंदर होणार नाही तोवर मी स्वस्थ बसणार नाही. शहराची डीप लीन मोहीम यापुढेही रोज सुरु राहणार आहे. महानगरपालिकेच्या अधिकार्यांनीही शहराच्या स्वच्छतेकडे जबाबदारीने कटाक्ष ठेवावा. कामचुकार कर्मचार्यांची हयगय न करता कडक कारवाई करा. नागरिकांनीही आपला परिसर स्वच्छ राहण्यासाठी आपलेही कर्तव्य आहे याची जाणीव ठेवावी, असे आवाहन आमदार संग्राम जगताप केले.



