नागपूरच्या चिंतन शिबिरात धर्मरावबाबा आत्राम यांचे मोठे स्पष्टीकरण
नागपूर / नगर सह्याद्री :
नागपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे चिंतिन शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरादरम्यान धर्मरावबाबा आत्राम यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यादरम्यान राष्ट्रवादी स्थानिक पातळीवर स्वबळावर लढणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना धर्मरावबाबा आत्राम यांनी महत्त्वाची माहिती दिली.
‘आज जे शिबिर आहे ते चिंतन होण्याच्या दृष्टिकोनातून आयोजित करण्यात आले आहे. संपूर्ण राज्यभरातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील नेते येथे (नागपूर) येत निवडणुकीसाठी येत आहेत. स्थानिक पातळीवर निवडणूक लढवण्यासाठी नेते इच्छुक आहेत. त्यावर विचार मंथन होईल. ही निवडणूक कार्यकर्त्यांच्या भरवशावर जिंकायची आहे. विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पुढे येत आहे. त्या दृष्टिकोनातून एकच म्हणणं आहे की, मतकी समान वाटप होत असेल तर महायुती म्हणून आपण लढायचे आहे’, असे वक्तव्य धर्मरावबाबा आत्राम यांना केले.
‘कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की, स्वबळावर लढले पाहिजे, त्यासाठी स्थानिक पातळीवर कुठल्या पद्धतीने नियोजन केले जाणार आहे?’ असा प्रश्न विचारला गेला. ‘स्वबळावर लढण्याबाबतची गोष्ट शेवटच्या क्षणी ठरवली जाऊ शकते. आजतरी आमचा विचार आहे की, महायुती म्हणूनच लढायचे’, असे धर्मरावबाबा आत्राम यांनी सांगितले.
अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नागपूरमध्ये भव्य चिंतन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिरात ५०० हून अधिक प्रतिनिधींनी सहभाग घेतला आहे. चिंतनानंतर ‘नागपूर जाहीरनामा’ स्वीकारणार येणार आहे. अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यासह अनेक प्रमुख नेते या शिबिराला उपस्थित होते.