spot_img
महाराष्ट्रकाँग्रेस खरोखर फुटणार का? आ. बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं...

काँग्रेस खरोखर फुटणार का? आ. बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं…

spot_img

नगर सह्याद्री / मुंबई
भाजपच्या तीन राज्यात विजय झाल्यानंतर आता काँग्रेस पक्षात फूट पडणार अशी चर्चा रंगली होती. जशी शिवसेना, राष्ट्रवादी फुटली तशी आता काँग्रेस फुटणार असे म्हटले जात होते. परंतु आता आ. बाळासाहेब थोरातांनी याबाबत मोठं स्पष्टीकरण दिल आहे.

आ. थोरात म्हणाले की, काँग्रेस पक्षात फूट पडणार असल्याच्या बातम्या धादांत खोट्या आणि खोडसाळपणाच्या आहेत. काँग्रेस पक्ष एकजूट असून जनविरोधी सरकारच्या विरोधात आम्ही संघर्ष करत राहू असेही ते म्हणालेत. आता सध्या लोकसभेचे वारे वाहू लागले आहे.

त्यानंतर लगेचच महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक होणार आहे. या दोन्ही निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिश्मा कायम राहण्याची चिन्हे असल्याने काँग्रेस आमदारांच्या पोटात गोळा आला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षातील आमदारांचा एक गट भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा आहे अशा पद्धतीच्या बातम्या व्हायरल होत होत्या. या पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात यांनी आपले मत स्पष्ट केले आहे.

एक्स या समाज माध्यमावर त्यांनी याबाबत खुलासा केला. विरोधी पक्ष एकजुटीने लढतो आहे. अशावेळी संभ्रम निर्माण करण्याच्या हेतूने काँग्रेस फुटीच्या बातम्या काही मंडळींकडून जाणीवपूर्वक पेरल्या जात आहे. माध्यमेही त्याला प्रसिद्धी देत असल्याचीच खंत आहे असे ते म्हणाले. ट्रिपल इंजिन सरकारच्या नाकर्तेपणामुळे राज्यातील शेतकरी अडचणीत आला आहे. सरकारमध्ये सुरू असलेल्या बेबंदशाहीमुळे सर्वसामान्य जनता हवालदिल आहे. महागाई आणि बेरोजगारी सर्वोच्च पातळीवर आहे. या सर्व नकारात्मक वातावरणात नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे, असे थोरात यांनी एक्समध्ये नमूद केले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

प्रस्थापितांनी धसका घेतलेले शिवाजीराव!

सारीपाट / शिवाजी शिर्के वसुबारसेच्या निमित्ताने सारेजण उत्साहात सकाळची आवराआवर करत असताना दूध उत्पादक...

कोल्हेवाडीत थरार! तरुणाने पेटवली कार; भांडण सोडवणे पडले महागात

अहिल्यानगर । नगर सहयाद्रील:- भांडण सोडवण्याचा प्रयत्न एका महिलेला चांगलाच महागात पडला. नगर तालुक्यातील...

नगर अर्बन बँक प्रकरण: ठेवीदारांसाठी महत्वाची अपडेट; ठेवी परत मिळणार?

अहिल्यानगर | नगर सह्याद्री भारतीय रिझर्व बँकेने नगर अर्बन को- ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना 4 ऑक्टोबर...

शहराच्या मध्यवर्ती भागात कोयता गँगचा कहर; इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यावर हल्ला..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- एका २२ वर्षीय मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना...