spot_img
महाराष्ट्रछगन भुजबळ कमळ हाती घेत लोकसभेच्या रिंगणात उतणार? मोठ्या राजकीय घडामोडींना वेग

छगन भुजबळ कमळ हाती घेत लोकसभेच्या रिंगणात उतणार? मोठ्या राजकीय घडामोडींना वेग

spot_img

नाशिक / नगर सहयाद्री : राजकीय पटलातून वारंवार विविध घडामोडी घडत आहेत. नवनवीन समीकरणे समोर येत आहेत. आता नाशिकमध्ये मोठ्या घडामोडी घडण्याच्या शक्यता आहेत.

साताऱ्याच्या बदल्यात नाशिक मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला देण्याच्या हालचाली सुरू आहेत. तेथून मंत्री छगन भुजबळ यांना तिकीट मिळू शकते. यासंदर्भात वरिष्ठ स्तरावर निर्णय झाला आहे. मुंबईत वरिष्ठ नेत्यांनी घेतलेल्या चर्चेतून ही माहिती पुढे आल्याचं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलं आहे.

भारतीय जनता पक्षाने नाशिक मतदारसंघातून छगन भुजबळ यांनी भाजपच्या कमळ या चिन्हावर उमेदवारी करावी, असा प्रस्ताव दिला आहे. हा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फेटाळून लावला आहे, तर भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावरच निवडणूक लढवतील, अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केली आहे.

यासंदर्भात येत्या 48 तासांमध्ये दोन्ही घटक पक्ष चर्चा करून निर्णय घेतील, असा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे मतदारसंघ, उमेदवार आणि निवडणुकीचे चिन्ह यासंदर्भात काय निर्णय होतो? याची उत्सुकता अनेकांना आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...