अहिल्यानगर । नगर सहयाद्री
यंदाची श्रीरामनवमी मिरवणूक अहिल्यानगर शहरातील सकल हिंदू समाजाच्या वतीने उत्साहात काढण्यात येणार आहे. पारंपरिक व जुन्या मार्गाने, आशा टॉकीज मार्गेच ही मिरवणूक काढण्यात येणार आहे. प्रशासनाने यात अडथळा आणल्यास, कार्यकर्त्यांना त्रास दिल्यास अहिल्यानगर शहरात बंद पुकारण्यात येईल, असा इशारा आमदार संग्राम जगताप यांनी दिला आहे.
श्रीरामनवमी उत्सव व मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार जगताप यांच्या उपस्थितीत सकल हिंदू समाजाची बैठक शुक्रवारी पार पडली. यात विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. आमदार जगताप म्हणाले की, मागील वर्षभरापूव प्रशासनाने हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर दबाव टाकून, त्यांना टार्गेट करून मिरवणुकीचा मार्ग बदलला होता. यावष 6 एप्रिलला शिवजयंती प्रमाणेच भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.
मोठ्या उत्साहात श्रीरामनवमी साजरी करण्यात येणार आहे. त्यामुळे पारंपरिक मार्गावरून आशा टॉकीजमार्गेच ही मिरवणूक काढण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.प्रशासनाने या उत्सवात आडकाठी आणू नये. मिरवणूक मार्गावर कार्यकर्त्यांना त्रास दिल्यास, दबाव टाकल्यास शहरात बंद पुकारण्यात येईल. तसेच, मिरवणूक जागेवरच थांबवण्यात येईल, असा इशारा आमदार जगताप यांनी दिला आहे. दरम्यान, आमदार जगताप यांनी हिंदुत्ववादी संघटनांना पाठबळ देत जुन्याच मार्गावरून मिरवणूक काढणार असल्याचे जाहीर केल्याने पोलिस प्रशासनाकडून काय भूमिका घेतली जाते, याकडे लक्ष लागले आहे.