spot_img
ब्रेकिंगत्यांचे 18 वर्षांत पाच कोटी; आमचे 25 कोटींचे नियोजन; डॉ. सुजय विखेंचा...

त्यांचे 18 वर्षांत पाच कोटी; आमचे 25 कोटींचे नियोजन; डॉ. सुजय विखेंचा माजी मंत्री थोरातांवर हल्लाबोल

spot_img

संगमनेर | नगर सह्याद्री:-
संगमनेरमध्ये त्यांनी अठरा वर्षात फक्त 5 कोटी रुपये खर्च केले. पुढच्या अडीच वर्षात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आ. अमोल खताळ यांच्या माध्यमातून 25कोटी रुपयांच्या विकास कामाचे नियोजन करून दुष्काळी भागाला सुजलाम सुफलाम करण्याचा प्रयत्न आमचा असेल अशी ग्वाही पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.

भोजापूर चारीचा जलपूजन सोहळा नान्नज दुमाला येथे डॉ. सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यानिमित्ताने त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाला नीलमताई खताळ, माजी तालुकाध्यक्ष भीमराव चतर, शिवसेनेचे विठ्ठलराव घोरपडे, संदीप देशमुख यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व हजारो ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, 40 वर्ष सत्तेत राहून पाणी न आणणाऱ्यांना जनतेनं बाजूला केलं आणि महायुतीवर विश्वास ठेवला. आज त्या विश्वासाला उत्तर दिलं जात आहे. मी यापूव शब्द दिला होता की ज्या दिवशी पाणी पोहोचेल, त्या दिवशीच मी इथे सभा घेईन आज तो दिवस आहे. ही केवळ सभा नाही तर जनतेच्या आश्वासनपूतची साक्ष आहे. आमदार अमोल खताळ यांनी हा संपूर्ण भाग पाणीदार करण्यासाठी जिद्दीने पाठपुरावा केला. जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून हा भाग आता जलसमृद्ध होतोय. त्यांच्या खांद्यावर जबाबदारी देण्यात आली आणि त्यांनी ती यशस्वीपणे पार पाडली याचा सार्थ अभिमान आहे.

नीलमताई खताळ म्हणाल्या, वर्षानुवर्षं महिलांनी पाण्यासाठी होरपळ सोसली. आज त्या प्रतीक्षेला न्याय मिळाला आहे. सुजय दादांनी आणि मंत्री विखे पाटील यांनी दिलेला शब्द आमदार अमोल खताळ यांनी खरा करून दाखवला आहे. तालुका त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.ही जलक्रांती केवळ विकासाचे प्रतीक नाही, तर सत्तांतरानंतर जनतेच्या अपेक्षांना मिळालेलं ठोस उत्तर आहे. महायुतीच्या नेतृत्वात संगमनेर तालुका जलस्वावलंबनाच्या दिशेने पुढे जात आहे. पाणी, रस्ते, शेती, शिक्षण, आरोग्य या साऱ्या क्षेत्रांतील कार्यक्षम नेतृत्वच खरा विकास घडवू शकते, असा ठाम विश्वास डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रकार! एका कारणामुळं शिक्षिकेची पदोन्नती रद्द; नेमकं काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एका महिला...

पारनेर तालुक्यात पिकांचा बनावट पंचनामा; सखोल चौकशीची मागणी

पिंपरी पठार, वेसदऱ्यात लाभार्थ्यांची बोगस यादी: सरपंच शिंदे पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर तालुक्यातील पिंपरी...

राज-उद्धव ठाकरेंच्या युतीचं अखेर ठरलं, जागावाटपाबाबत मोठी माहिती समोर!

मुंबई / नगर सह्याद्री : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात मनसेचे आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यात...

सरपंच संजय रोकडे यांची आक्रमक भूमिका; ग्रामस्थांसह ‘या’ कामांसाठी करणार उपोषण..

पारनेर । नगर सहयाद्री:- वडगाव सावताळ ते गाजदिपूर या गावांना जोडणाऱ्या रस्त्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी...