spot_img
अहमदनगरसुजय विखे यांच्या पराभवाचे भाजप करणार चिंतन! कोण असणार पक्ष निरीक्षक? वाचा...

सुजय विखे यांच्या पराभवाचे भाजप करणार चिंतन! कोण असणार पक्ष निरीक्षक? वाचा सविस्तर…

spot_img

खा. मेधा कुलकर्णी देणार अहवाल | पराभवाची होणार चौकशी
अहमदनगर । नगर सहयाद्री
सुजय विखे पाटील यांच्यासह राज्यातील ३३ लोकसभा मतदारसंघातील पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. महायुतीला पराभव पत्करावा लागलेल्या ३३ लोकसभा मतदारसंघासाठी भाजपाने पक्ष निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. खासदार मेधा कुलकर्णी या सुजय विखे पाटील यांच्या पराभवाचा अहवाल भाजप प्रदेशाला सादर करणार आहे.

राज्यात भाजपने २८ जागा लढविल्या. प्रदेश भाजपने शिंदेसेना आणि अजित पवार गटाच्या वाट्याला गेलेल्या मतदारसंघांमधील जय- पराजयाची कारणे शोधून काढण्याचे ठरविले आहे. विधानसभा निवडणुकीचा तिन्ही पक्ष म्हणून एकत्रितपणे विचार करताना हे अहवाल महत्त्वाच ठरणार असल्याची माहितीआहे. महायुतीला पराभव पत्करावा लागलेल्या ३३ मतदारसंघांसाठी भाजपने निरीक्षकांची नियुक्ती केली आहे.

तसेच ज्या १७ मतदारसंघांमध्ये महायुती विजयी झाली. तेथेही निरीक्षक पाठविण्यात येणार आहेत. सर्वांना २२ जूनच्या आत प्रदेश भाजपाला अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान नियुक्त करण्यात आलेले निरीक्षक प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघांमधील प्रमुख पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी आणि जुन्याजाणत्या नेत्यांशी चर्चा करून जय- पराजयाची करणे शोधणार आहे. भाजप अंतर्गत गटबाजीचा कुठेकुठे फटका बसला अशा सगळ्या मुद्द्यांवर निरीक्षक अहवाल देणार आहेत.

विखेंच्या पराभवाचे होणार चिंतन
नगर लोकसभा मतदार संघातील भाजपाचे उमेदवार सुजय विखे पाटील यांचा ३१ हजार मतांनी पराभव झाला. विखें पाटील यांच्या पराभवाची खा. मेधा कुलकर्णी चौकशी करणार आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष, प्रदेश कार्यकारणी सदस्य, यासह आजी माजी लोकप्रतिनिधी यांच्याशी संवाद साधत पराभवाच्या कारणाचा शोध कुलकर्णी घेणार आहेत. दरम्यान निष्ठांवत भाजप नेत्यासोबत देखील स्वतंत्र संवाद साधणार आहे.

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर नांदेडची जबाबदारी
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना भाजपात घेणे आणि लगेच त्यांना राज्यसभा देणे यामुळे नांदेड मतदारसंघात भाजपविरोधी वातावरण तयार झाले होते. याचा परिणाम लोकसभा निकालावर दिसून आल्याचा आरोप पराभूत उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केला होता. त्यामुळे पराभावाचे कारणे शोधून अहवाल सदर करण्याची जबाबदारी ही मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर देण्यात आली आहे. विखे व चव्हाण यांच्यामधील ऋणानुबंध आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कारागृहातून आरोपीने पाठवले साक्षीदाराला धमकीचे पत्र; वाचा अहिल्यानगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील साई कॉलनी परिसरात साक्षीदाराला पत्राद्वारे धमकी दिल्याचा प्रकार घडला....

पुण्यात नात्यांमध्येच रक्तरंजित थरार; आयुषच्या हत्येची धक्कादायक माहिती उजेडात

पुणे / नगर सह्याद्री - पुणे शहरातील नाना पेठ परिसरामध्ये झालेल्या आयुष कोमकर हत्या प्रकरणातील...

शहरात साहित्योत्सव रंगणार; संमेलनाची तयारी पूर्ण, ११, १२ सप्टेंबरला भरगच्च कार्यक्रम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- पुणे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सावेडी उपनगर शाखा आयोजित राज्यस्तरीय युवा साहित्य...

शासन निर्णय मागे घेण्याची आवश्यकता नाही!; मंत्री विखे पाटील

मंत्री छगन भुजबळ यांची मागणी फेटाळली मुंबई । नगर सहयाद्री:- मराठा आरक्षणाच्या संदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीने...