spot_img
अहमदनगरअक्षय कर्डिलेंना जिल्हा बँकेत तोच न्याय मिळणार का?

अक्षय कर्डिलेंना जिल्हा बँकेत तोच न्याय मिळणार का?

spot_img

अहिल्यानगर / नगर सह्याद्री
आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या अकाली निधनानंतर जिल्ह्याच्या राजकारणासह जिल्हा बँकेत देखील मोठी पोकळी निर्माण झाली आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून शिवाजीराव कर्डिले यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला होता. जिल्हा बँकेचे संचालक असताना यापूर्वी जयंतराव ससाणे आणि उदयराव शेळके यांचे निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या जागी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना बँकेचे संचालक म्हणून घेण्यात शिवाजीराव कर्डिले यांनी मोलाची भूमिका बजावली होती. त्यांच्यामुळेच ससाणे आणि शेळके परिवाराला पुन्हा बँकेत संचालकपद मिळाले. आता आमदार कर्डिले यांचे अकाली निधन झाल्यानंतर रिक्त झालेल्या संचालक पदावर अक्षय कर्डिले यांना संधी मिळणार किंवा नाही यासह बँकेचे अध्यक्ष पद देखील त्यांना मिळणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह जिल्ह्यातील नेते मंडळी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

जिल्हा बँकेमध्ये शिवाजीराव कर्डिले यांनी दोनदा अध्यक्षपद भूषविले. विद्यमान अध्यक्ष म्हणून काम करत असताना त्यांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटविला. बँकेचे अनेकधाडसी निर्णय त्यांच्या कारकीर्दीत झाले. जिल्हा बँकेत यापूर्वी संचालकअसताना माजी आमदार राजीव राजळे यांचे निधन झाले. या रिक्त झालेल्या जागेवर त्यांच्या पत्नी मोनिकाताई राजळे यांना संचालक म्हणून घेण्यात आले. त्यावेळी देखील शिवाजीराव कर्डिले यांनी मोलाची भूमिका बजावली होती. श्रीरामपूरचे माजी आमदार जयंतराव ससाणे हे जिल्हा बँकेत संचालक होते. संचालक असताना त्यांच्यावर काळाचा घाला आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. जयंतराव ससाणे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या संचालक पदावर त्यांचे चिरंजीव करण ससाणे यांना संधी देण्यात आली होती. त्यावेळी देखील शिवाजीराव कर्डिले यांनी पुढाकार घेतला होता.

विद्यमान संचालक मंडळाची निवडणूक झाल्यानंतर बँकेच्या अध्यक्ष पदासाठी उदयराव गुलाबराव शेळके यांचे नाव अंतिम झाले आणि त्यांना अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. उदयराव शेळके यांनी बँकेला आर्थिक शिस्त लावताना अनेक धाडसी निर्णय घेतले. मात्र दुर्दैवाने गंभीर आजारात त्यांचे निधन झाले. उदयराव शेळके यांच्या निधनानंतर बँकेच्या अध्यक्षपदी आमदार शिवाजीराव कर्डिले यांची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी निवड होताच संचालक मंडळाच्या पहिल्याच बैठकीत शिवाजीराव कर्डिले यांनी उदयराव शेळके यांच्या पत्नी गीतांजली शेळके यांची संचालकपदी निवड केली आणि शेळके कुटुंबाला न्याय देण्याची भूमिका घेतली.

राजळे, ससाणे आणि शेळके या दिग्गज कुटुंबांसाठी जिल्हा बँकेची कवाडे उघडणार्‍या शिवाजीराव कर्डिले यांचे आठ-दहा दिवसांपूर्वी निधन झाले आणि सर्वांनाच मोठा धक्का बसला. आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाने आता जिल्हा बँकेत अक्षय कर्डिले यांना संचालकपदाची संधी आलेली आहे. ही संधी मिळवून देण्यासह त्यांना बँकेचे अध्यक्षपद मिळेल का याबाबत आता सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह जिल्ह्यातील नेतेमंडळी याबाबत काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

..आता दिल्लीनेही दखल घेतली पाहिजे, अशी तयारी करा; राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश

मुंबई । नगर सहयाद्री:- राज्यातील विरोधकांनी निवडणूक आयोगाच्याविरोधात आता एल्गार पुकारला आहे. विरोधकांनी रस्त्यावर उतरून...

संतापजनक! रुग्णवाहिकेत आशा वर्करसोबत भयंकर घडलं, रात्री परतताना चालकाने केलं असं काही..

Maharashtra Crime News : महिलांचा लैंगिक छळ, अत्याचाराच्या घटना अजूनही थांबत नाहीत. अशात सहकाऱ्याकडूनच...

हवामान खात्याची महत्वाची अपडेट, काय दिला इशारा?, वाचा सविस्तर

मुंबई । नगर सहयाद्री:- कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांत गेल्या दोन दिवसांपासून...

अहिल्यानगर जिल्ह्यात राजकीय उलथापालथ; नगराध्यक्षपदासाठी जोरदार लढती! ‘या’ पक्षाचा ‌‘स्वबळाचा नारा‌’

श्रीगोंदा । नगर सहयाद्री: श्रीगोंदा तालुक्यात सध्या राजकीय हालचालींना वेग आला असून विविध पक्ष...