spot_img
ब्रेकिंगअजितदादांची भाऊबीजेला वाट बघणार का? सुप्रिया सुळेंचं एका वाक्यात उत्तर, वाचा..

अजितदादांची भाऊबीजेला वाट बघणार का? सुप्रिया सुळेंचं एका वाक्यात उत्तर, वाचा..

spot_img

Supriya Sule News: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं घोडामैदान जवळ आलं आहे. २० नोव्हेंबरला महाराष्ट्रात सार्वत्रिक निवडणूक पार पडणार आहे. तर २३ नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. महायुती की महाविकास आघाडी? कोण जिंकणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दरम्यान बारामतीत सुप्रिया सुळे यांच्यासह जात युगेंद्र पवार यांनी अर्ज दाखल केला. यावेळी सुप्रिया सुळेंनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

बारामतीतून सुप्रिया सुळे जिंकल्यानंतर शरद पवारांना मोठा दिलासा मिळाला. या निवडणुकीत सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी युगेंद्र पवार उतरले होते. “आम्ही लोकसभेला चांगली कामगिरी केली. तशीच चांगली कामगिरी आम्ही विधानसभा निवडणुकीतही करणार आहोत. कारण आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांचा विचार पुढे न्यायचा आहे. शरद पवार जे उमेदवार जाहीर करतील त्यांना मी पाठिंबा देईन असंही युगेंद्र पवार म्हणाले होते. याच युगेंद्र पवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, मी सगळ्यांच्या चांगल्या आठवणीच लक्षात ठेवते. बारामतीची मायबाप जनता शरद पवारांवर सहा दशकांपासून प्रेम करते आहे. आमचं नातं प्रेमाचं आणि विश्वासाचं आहे. एक काळ असाही होता की पवार कुटुंबाला कुणी ओळखत नव्हतं पण बारामतीकरांनी जी आपुलकी आणि प्रेम दाखवलं त्यामुळे पवार कुटुंब ओळखलं जात आहे.

दरम्यान अजित पवारांची भाऊबीजेला वाट पाहणार का? असा प्रश्न विचारला असता सुप्रिया सुळे म्हणाल्या, कसं असतं एकतर प्रेम कुठूनही केलं तरीही ते प्रेमच असतं. ते एकतर्फीही असू शकतं. आपण प्रेम जेव्हा करतो तेव्हा अपेक्षा कशाला ठेवायची? असं उत्तर सुप्रिया सुळेंनी दिलं आहे. बारामतीत युगेंद्र पवार यांचा अर्ज दाखल करण्याआधी सुप्रिया सुळेंनी एबीपी माझाशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी अजित पवारांबाबत हे विधान केलं आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेरचे माफिया राज रोखण्यासाठी निवडणूकीत महायुतीला पाठबळ द्या : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

निघोज / प्रतिनिधी रेडबुलचा वापर करुण पारनेरचा माफियाराज माध्यमातून सर्वसामान्य जनतेला दादागीरीला सामोरे जावे लागत...

अखेर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र; मुश्रीफ यांची मोठी घोषणा

कोल्हापूर / नगर सह्याद्री : राज्य पातळीवर शरद पवार आणि अजित पवार गट वेगवेगळे असले...

निवडणुकीची रणधुमाळी! उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात; आघाडी-युतीचे तळ्यात मळ्यात

अहिल्यानगर जिल्ह्यातील 12 पालिकांसाठी हालचाली  अहिल्यानगर | नगर सह्याद्री जिल्ह्यातील 12 पालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा बिगुल वाजला...

अरणगाव शिवारात दोन गटात राडा; लोखंडी गज, काठीने मारहाण, वाचा प्रकरण?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नगर तालुक्यातील अरणगाव शिवारातील शिंदे मळा परिसरात दोन गटात शेतीच्या...