spot_img
ब्रेकिंगAditya Thackeray News: आदित्य ठाकरे यांना धक्का बसणार? 'त्या' प्रकरणाची SIT चौकशी...

Aditya Thackeray News: आदित्य ठाकरे यांना धक्का बसणार? ‘त्या’ प्रकरणाची SIT चौकशी होणार..

spot_img

मुंबई। नगर सह्याद्री

राजकीय वर्तुळातून एक मोठी अपडेट समोर आली आहे. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दिशा सालियान मृत्यू प्रकरणात राज्य सरकारकडून आदित्य ठाकरे यांची एसआयटी चौकशी केली जाणार आहे.

दिशा सालियानच्या मृत्यू प्रकरणी नेमके आदित्य ठाकरे त्यावेळी कुठे होते? असा प्रश्न अनेक आमदारांकडून सातत्यानं उपस्थित करण्यात आला होता. त्यामुळे दिशा सालियान प्रकरणी राज्य सरकार आदित्य ठाकरेंची एसआटची चौकशी करणार आहे. तसेच, एसआयटीसंदर्भात आजच ऑर्डर येण्याची शक्यता आहे. सुजाता सौनिक आज एसआयटी संदर्भात ऑर्डर काढू शकतात. अशी माहिती समोर आली आहे.

काय आहे प्रकरण ?

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची मॅनेजर दिशा सालियान हिचा ८ जून २०२० ला रोजी मृत्यू झाला होता. पण, तिची हत्या झाली असा संशय व्यक्त करत आरोप करण्यात आला होता. दिशाच्या मृत्युनंतर जवळपास ६ दिवसांनी अभिनेता सुशांतसिंह राजपूत हा आपल्या घरात मृतावस्थेत आढळून आला होता.

यामुळे दिशाच्या मृत्यू प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि भाजप आमदार नितेश राणे यांनी एसआयटी चौकशीची मागणी केली होती. त्यावर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात याप्रकरणी SIT चौकशीचे आदेश दिले होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी! अजित पवारांचा स्वबळाचा इशारा…

पुणे / नगर सह्याद्री - राज्यात सध्या महायुतीचं सरकार असलं तरी स्थानिक निवडणुकीत सर्व पक्ष...

मनोज जरांगेंचा सरकारला अल्टीमेटम; बैठक निष्फळ, प्रमाणपत्र द्यावं लगेच आंदोलन सोडेन… राज्यात काय काय घडलं पहा

मुंबई | नगर सह्याद्री Maratha Reservation Row: आरक्षणाबाबत काम करणाऱ्या शिंदे समितीनं ६ महिन्यापासून...

मनोज जरांगे हा पवारांचा सुसाईड बॉम्ब; भाजप आमदार काय म्हणाले पहा

मुंबई / नगर सह्याद्री : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागण्यासाठीच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे....

चिचोंडीला कांदा मार्केट सुरु करण्याचा मानस: आ. कर्डिले

नेप्ती उपबाजार भव्य कांदा शेडचे भूमिपूजन अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नेप्ती उपबाजारची जागा कमी पडत...