Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता कधी येणार असा प्रश्न महिला विचारत आहेत. मे महिन्याच्या शेवटचा आठवडा सुरु झाला आहे तरीही अद्याप योजनेच्या हप्त्याबबातत कोणतीही घोषणा झालेली नाही. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. दरम्यान आता मे आणि जून महिन्याचा हप्ता एकत्र येणार का असा प्रश्नही महिला विचारत आहेत.
मे महिन्याचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहेत. त्यातच अनेकजण मे आणि जून महिन्याचा हप्ता एकत्र येणार असल्याचे बोलत आहे. याचे कारण असे की, आता मे महिना संपायला फक्त १० दिवस उरले आहेत. त्याचसोबत एप्रिल महिन्याचा हप्ता मे महिन्याच्या सुरुवातीला देण्यात आला होता. त्यामुळे मे महिन्याचा हप्तादेखील लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.
जर मे महिन्याचा हप्ता लांबणीवर गेला तर महिलांना जून आणि मेचे पैसे एकत्र येण्याची शक्यता आहे. दोन्ही हप्ते ३००० रुपये महिलांच्या खात्यात जमा होतील. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. अधिकृत माहिती समोर आल्यानंतरच मे आणि जूनचा हप्ता एकत्र येणार की नाही हे स्पष्ट होईल.