spot_img
अहमदनगरपत्नीचा खून पतीची आत्महत्या; अहिल्यानगरमधील धक्कादायक घटना

पत्नीचा खून पतीची आत्महत्या; अहिल्यानगरमधील धक्कादायक घटना

spot_img

कोपरगाव / नगर सह्याद्री :
कोपरगाव तालुक्यातील चासनळी गावात शुक्रवार दिनांक २२ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेच्या दरम्यान धक्कादायक घटना उघडकीस आली. दिलीप मिजगुळे यांनी कौटुंबिक वादातून पत्नी स्वाती मिजगुळे (अंगणवाडी सेविका) यांना मारहाण करून खून केला आणि त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे निष्पन्न झाले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की सकाळ पासून घराचा दरवाजा बंद असल्याने शेजाऱ्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले असता हा प्रकार समोर आला. सदर घटनेची माहिती कोपरगाव तालुका पोलिसांना मिळताच तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी हे आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले तसेच शिर्डी उपविभागीय अधिकारी अमोल भारती यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान,दिलीप हे गळफास घेतलेल्या अवस्थेत तर स्वाती मृतावस्थेत राहत्या घरात आढळून आल्या.असून घरातील भिंतीवर दिलीप यांनी आत्महत्या करण्यापूर्वी काही लिहून ठेवलेले आढळले असून,नेमके काय लिहिले आहे हे तपासानंतर स्पष्ट होईल,अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

तसेच मृत स्वाती मिजगुळे या अंगणवाडी सेविका असल्याने त्यांच्या मृत्यूने चासनळी गावासह परिसरातील महिला वर्गासह संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे चासनळी गावात भयान शांतता पसरली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दंडगव्हाळ, सपकाळेंनी खाकीची केली बेअब्रू!; एसपी साहेब, तुमच्या नावाचा होतोय गैरवापर!

अहिल्यानगर | नगर सह्याद्री पोलिस अधीक्षक म्हणून खमकी भूमिका बजावत असणाऱ्या सोमनाथ घार्गे यांच्या टीममध्ये...

गट, गणांची मोडतोड; कही खुशी कही गम; जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या गट-गणांची अंतिम प्रभाग रचना जाहीर

जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या गट-गणांची अंतिम प्रभाग रचना जाहीर | इच्छुकांचे मैदान ठरले अहिल्यानगर |...

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची मोठी कारवाई; गोवंशीय जनावरांची कत्तल करणारी टोळी १ वर्षासाठी हद्दपार

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची तिसरी मोठी कारवाई राहाता । नगर सहयाद्री  ममदापुर (ता. राहाता)...

अजित पवार मुख्यमंत्री होणार, उद्धव ठाकरेंना हलक्यात घेऊ नका; पुण्यातील ज्योतिषांचं भाकीत चर्चेत

Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चा रंगत आहेत, कारण पुण्यात भरलेल्या ४३ व्या...