spot_img
ब्रेकिंगआता कशासाठी थांबायचे?; पक्ष सोडण्यावर नगरसेवक, पदाधिकारी ठाम

आता कशासाठी थांबायचे?; पक्ष सोडण्यावर नगरसेवक, पदाधिकारी ठाम

spot_img

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:-
विधानसभा निवडणुकीवेळी वारंवार मागणी करूनही पक्षाच्या वरिष्ठांनी, नेतृत्वाने आमची दाखल घेतली नाही. शहरात उमेदवारी दिली असती, तर चित्र वेगळे असते, शहरात पक्ष, कार्यकर्ते टिकले असते. आता आम्ही कुणासाठी व कशासाठी थांबायचे, असा सवाल करत शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी संपर्क प्रमुख आमदार सुनील शिंदे यांना जाब विचारला. नगरसेवकांनी निर्णय घेतले आहेत, कुणीही थांबायच्या मानसिकतेत नाही, असेही नगरसेवकांनी स्पष्ट केले.

शहरातील ठाकरे गटातील जवळपास सर्वच नगरसेवक पक्ष सोडण्याच्या तयारीत आहे. तिघांनी मागील आठवड्यात शिवसेना शिंदे गटात प्रवेशही केला आहे. या पार्श्वभूमीवर संपर्कप्रमुख शिंदे यांनी सुपा येथे ठराविक नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी शहरप्रमुख संभाजी कदम, उपजिल्हाप्रमुख भगवान फुलसौंदर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, दत्ता कावरे, परेश लोखंडे, संतोष गेनाप्पा, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, श्रीकांत पठारे आदी उपस्थित होते.

आमदार शिंदे यांनी नगरसेवकांना थांबण्याचा व पुन्हा विचार करण्याचा सल्ला दिला. मात्र, नगरसेवकांनी आक्रमक भूमिका मांडत पक्षाने अहिल्यानगर शहरातील शिवसैनिक, नगरसेवक, पदाधिकारी सर्वानाच वाऱ्यावर सोडले, कुणाचीही दखल पक्षाने घेतली नसल्याची खंत व्यक्त केली. आता कुणीही ऐकायच्या, थांबण्याच्या मनस्थितीत नाही. कुणासाठी व कशासाठी थांबतील?

थांबल्याने काय होणार आहे, अशा प्रश्नांचा भडीमार नगरसेवकांनी केला. नगर, पारनेर तालुक्यातील सदस्यांनी, पदाधिकाऱ्यांनीही पक्षाच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली. यावर आमदार शिंदे निरुत्तर झाले. दरम्यान, लवकरच शिंदे गटात प्रवेशाबाबत नगरसेवक निर्णय घेतील, असे नगरसेवकांकडून सांगण्यात आले

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मार्केटयार्डमध्ये भीषण आग; लाखोंचे साहित्य जाळून खाक

दीड लाखांचे नुकसान, वर्षानुवर्षांची बिले जळून खाक! अहिल्यानगर / नगर सह्याद्री - मार्केटयार्डमधील जयप्रकाश कस्तुरचंद कटारिया...

लाडक्या बहि‍णींवर सरकारचा लेटरबॉम्ब! ‘या’ महिलांनाच मिळणार दीड हजार

मुंबई / नगर सह्याद्री - 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेतील सर्व लाभार्थींना ईकेव्हायसी बंधनकारक करण्यात...

नगरमध्ये जात प्रमाणपत्रासाठी १८ हजार रुपयांची लाच; ‘ती’ महिला जाळ्यात

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - शहरातील जात पडताळणी प्रमाणपत्र मिळवून देण्याच्या मोबदल्यात एका खाजगी महिलेच्या...

चारित्र्याच्या संशयावरुन विवाहितेला धमक्या; हुंडा, अत्याचार, कुठे कुठे काय काय घडलं पहा

विवाहितेची पती-सासरच्यांविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा अहिल्यानगर / नगर सह्याद्री - लग्नानंतर अवघ्या एका महिन्यातच...