spot_img
अहमदनगरपावसाळ्यात रस्त्याचे काम करण्याचा अट्टाहास का? प्रकाश पोटे यांनी घेतली आक्रमक भूमिका?

पावसाळ्यात रस्त्याचे काम करण्याचा अट्टाहास का? प्रकाश पोटे यांनी घेतली आक्रमक भूमिका?

spot_img

जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने अधीक्षक अभियंता यांना निवेदन
अहमदनगर / नगर सह्याद्री –
नगर तालुक्यातील मांडवे गाव ते शिराढोण या गावान दरम्यान नव्याने डांबरीकरणाचे ४ कोटी रुपयांचे काम मागील एक महिन्यापासून सुरू आहे. व जवळपास मागील महिनाभरापासूनच या ठिकाणी रोज सतत पाऊस पडत आहे. वास्तविक पाहिलं तर डांबरीकरणाचे काम हे उष्ण वातावरणातच केले जाते, कारण डांबर हे उष्ण असल्यानंतर तसेच ज्या रस्त्यावर डांबरीकरण करण्यात येणार आहे. त्या रस्त्याचा पृष्ठभाग उष्ण असल्यानंतरच डांबर पघळते आणि रस्त्याचे काम व्यवस्थित होऊन रस्ता जास्त दिवस टिकतो. सदर रस्त्याच्या कामाची जबाबदारी आपल्या विभागाचे शाखा अभियंता बापूसाहेब वराळे यांच्याकडे आहे. शाखा अभियंता बापूसाहेब वराळे यांची मागील महिन्यातच बदली होऊन त्यांची नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता पदी निवड झालेली आहे. त्यामुळे स्वतःच्या हातच ४ कोटीच काम हे इतर दुसऱ्या अभियंत्याकडे जाऊ नये, त्यासाठी टक्केवारीची ठरलेली रक्कम स्वतःला मिळावी याच टक्केवारीच्या अमिषा पोटी त्यांनी सर्वसामान्यांचे शासनाचे तब्बल ४ कोटी रुपये एवढा निधी पाण्यात घालण्याचे काम केले आहे.

शासन निर्णयानुसार कुठलेही डांबरीकरणाचे काम हे पावसाळ्यात किंवा पावसा सदृश्य स्थिती असताना किंवा हवामान थंड असताना डांबरीकरणाचे काम करू नये असा निर्णय दिलेला आहे. परंतु या ठिकाणी जाणून बुजून शाखा अभियंता बापुसाहेब वराळे यांनी शासनाचा पैसा पाण्यात घालण्याचे काम केले आहे. हा रस्ता आता महिनाभरात अनेक ठिकाणी उखडलेला आहे. त्यामुळे या रस्त्यास पावसाळ्यात सुरू करण्याचे आदेश देणाऱ्या शाखा अभियंता बापुसाहेब वराळे यांच्यावर शासन निर्णयाचे उल्लंघन केल्याने कठोर कारवाई करण्यात यावी व रस्ता पूर्णपणे पुन्हा दुसऱ्यांदा करण्यात यावा या मागणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यांना निवेदन देताना जन आधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे समवेत अमित गांधी, दीपक गुगळे, गणेश तोडमल, शिवाजी बेरड, शहानवाज शेख, अशोक बनसोडे आदी उपस्थित होते.

अन्यथा आपल्या कार्यालयावर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू डांबरीकरणाचे काम पावसाळ्यात करण्यात येऊ नये यासाठी शासन निर्णयाची साक्षांकित प्रत देखिल दिली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शनी शिंगणापूर बनावट अ‍ॅप प्रकरणात धक्कादायक माहिती आली समोर; कोणाच्या खात्यावर पैसे जमा – एसपींनी दिली महत्वाची माहिती

चौकशीतून माहिती उघड | एसपी सोमनाथ घार्गे यांची माहिती अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शनैश्वर देवस्थानशी...

महाभूकंप! ८.७ तीव्रतेच्या भूकंपाने पॅसिफिक महासागर हादरला, त्सुनामीचा धोका

नगर सह्याद्री वेब टीम : रशियाच्या पूर्व किनारपट्टीवर असलेल्या कामचटका द्वीपकल्पाजवळ समुद्राखाली अत्यंत शक्तिशाली भूकंपाची...

शहर जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी ‘दीप चव्हाण’

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.मल्लिकार्जुन खर्गे यांच्या मान्यतेने दीप...

लाखो नागरिकांचे हाल, केडगावचा पाणीपुरवठा सुरळीत करा; मनोज कोतकर यांची मागणी

अहिल्यानगर | नगर सह्याद्री केडगाव उपनगरातील विस्कळीत पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांचे प्रचंड हात होत आहेत. त्यामुळे...