spot_img
ब्रेकिंगपंकजा मुंडे आणि मनोज जरांगे एकाच मंचावर, कारण काय? पहा..

पंकजा मुंडे आणि मनोज जरांगे एकाच मंचावर, कारण काय? पहा..

spot_img

बीड । नगर सहयाद्री-
भाजपाच्या लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे आणि मराठा आंदोलन जरांगे पाटील हे एकाच मंचावर आले होते. यावेळी पंकजा मुंडे यांनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस देखील केली. मात्र, यावेळी मंचावर आसन व्यवस्थेवरून काही काळ गोंधळ निर्माण झाला होता.

बीडच्या सिरसमार्गमध्ये अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मनोज जरांगे पाटील या सप्ताहासाठी रुग्णालयातून भेट देण्यासाठी आले होते तर पंकजा मुंडे यांनी देखील सप्ताहास हजेरी लावली होती. मात्र, यावेळी मंचावरील आसन व्यवस्थेवरून गोंधळ होताच पंकजा मुंडे यांनी माईक हातात घेत शांत राहण्यास सांगितले.

कार्यक्रमात मनोज जरांगे यांची मोठी घोषणा
राज्य सरकारने तात्काळ सग्या सोयऱ्याची अंमलबजावणी न केल्यास 288 विधानसभेच्या जागा लढवणार असून विधानसभेच्या निवडणुकीत मी स्वतः देखील उभा राहणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही जरी उमेदवार उभे केले नसले तरी विधानसभेच्या निवडणुकीत सर्व समाजाला एकत्र करून निवडणूक लढणार आहे.
– मनोज जरांगे पाटील

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बागेश्वर धाममध्ये मोठी दुर्घटना; आरतीनंतर नेमकं काय घडलं?

Bageshwar Dham: मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील गढा गावात असलेल्या बागेश्वर धाम याठिकाणी एक मोठी...

तारण ठेवलेले सोने हेल्परने चोरले!, संधी मिळेल तेव्हा टाकायचा डाव..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री ग्राहकांनी तारण ठेवलेले लाखोंचे सोने हेल्परनेच चोरून नेल्याची धक्कादायक घटना...

पोटची मुलगी गेली, भावाची मुलगी मारली; पारनेरमध्ये चुलत्याकडून पुतणीचा खून!

पारनेर । नगर सहयाद्री :- जुन्या रागातून चुलत्याकडून १६ वर्षीय मुलीचा डोयात दगड घालून...

औरंगजेबाविषयी गौरवोद्गार; निघोजमध्ये तणाव; नेमकं काय घडलं?

निघोज । नगर सहयाद्री:- पाच महिन्यापूर्वी येथील एका कुटुंबातील १६ वर्षीय युवकाने औरंगजेबाविषयी गौरवोद्गार...