नगरसह्याद्री टीम : आपल्या दैनंदिन जीवनात आपण अनेक गोष्टी पाहतो ज्या आपण जवळजवळ गृहीत धरतो. यातील अनेक गोष्टी आपण रोज पाहत असल्याने त्या नॉर्मल आहेत असे गृहीत धरतात.
आपण इतके गृहीत धरले आहे की आपण त्याबद्दल कधीच जास्त विचार करत नाही. सोशल मीडियावर अशा गोष्टींची अनेकदा चर्चा होत असते. सध्या असाच एक प्रश्न सोशल मीडियावर विचारला जात आहे तो म्हणजे लष्करी जवानांचे केस बारीक का असतात? चला याबद्दल जाणून घेऊयात –
लष्करी जवानांचे केस बारीक का असतात?
लष्करामधील जवानांना जर पाहिलं तर एक गोष्ट प्राकर्षाने जाणवते ती म्हणजे या जवानांची हेअरस्टाइल अगदी साचेबद्ध असते. म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचं झालं तर लष्करी जवानांच्या हेअरस्टाइल वेगवेगळ्या असल्या तरी केसांची लांबी ही फार नसते. एवढे छोटे केस ठेवण्यामागील नेमकं लॉजिक काय असतं? चला पाहुयात –
हे आहे मूळ कारण
जेव्हा युद्ध होते तेव्हा सैनिक खूप व्यस्त असतात. त्यांना दैनंदिन कामकाजासाठी वेळ नसतो. सैनिकांचे केस लांब असतील तर त्याद्वारे इतरांना वेगवेगळ्या आजारांचा संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे असा संसर्ग टाळण्यासाठी आणि कोणालाही संसर्ग होऊ नये यासाठी सैनिकांनी आपले केस उंचीने लहान ठेवावेत, असे सांगितले जाते असे क्वोरा या साईटवर म्हटलं आहे.
ही कारणे देखील आहेत महत्त्वाची
युद्ध सुरु असताना सैनिकांना अनेक प्रकारची हत्यारं तसेच डोक्यावर हेल्मेट घालून वाटचाल करावी लागते. केस छोटे असतील तर घाईगडबडीत आणि कमी वेळात हेल्मेट डोक्यावर घालून ते बेल्टच्या मदतीने पॅक करता येतं. युद्धामध्ये सैनिक बंदुकींचा वापर करतात.
युद्धामध्ये सैनिकांना लक्ष्याचा वेध घ्यावा लागतो. त्यामुळे केस लांब असतील तर लक्ष्याचा वेध घेताना त्यांचा त्रास होऊ शकतो. त्यामुळेच या सर्व गोष्टींचा विचार करुन सैनिकांना केस छोटे ठेवण्यास सांगितलं जातं.