spot_img
अहमदनगरआयत्या पिठावर रेघोट्या मारून, खोटे सांगून क्रेडिट का घेता?; माजी मंत्री थोरात...

आयत्या पिठावर रेघोट्या मारून, खोटे सांगून क्रेडिट का घेता?; माजी मंत्री थोरात यांचा विरोधकांना सवाल

spot_img

संगमनेर | नगर सह्याद्री
दुष्काळी भागाला पाणी मिळावे याकरता सहकारमहष भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून कारखान्याच्या माध्यमातून भोजापुर चारीचे काम पूर्ण केले. कारखान्याने या कामासाठी 80 लाख रुपयांचा निधी खर्च केला तसेच आपण जलसंधारण मंत्री असताना वेळोवेळी निधी मिळवला. चारीचे काम पूर्ण झालेले होते. चारी आम्हीच केलेली आहे. सुदैवाने मे महिन्यात चांगला पाऊस झाला आणि पाणी आले त्यात तुमचे योगदान काय. आयत्या पिठावर रेघोट्या ओढता. काम न करता खोट्यानाट्या गोष्टी सांगून क्रेडिट का घेता असा थेट सवाल माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोधकांना केला आहे.

यावेळी भोजापुर चारीच्या कामाबाबत बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, दुष्काळी भागाला पाणी मिळावे याकरता कारखान्याच्या मदतीने भोजापुर चारी केली गेली. त्यावेळी संगमनेर व प्रवरा कारखान्याच्या माध्यमातून ही चारी करायची होती. पूर्वेच्या लोकांनी याकडे पाहिले सुद्धा नाही. आपल्या कारखान्याने 80 लाख रुपये खर्च केला. चारी तयार झाली आपण जलसंधारणमंत्री झाल्यानंतर वेळोवेळी निधी मिळवला. चारी तिगाव माथ्यापर्यंत नेली. महाविकास आघाडी काळामध्ये शंकराव गडाख जलसंधारण मंत्री असताना पुन्हा 2 कोटी 12 लाख रुपयांचा निधी मिळवला. चारी पूर्ण तयार केली.

पावसाळ्यामध्ये दरवष चारीची देखभाल दुरुस्ती कारखान्याने केली.ही चारी काही आठ महिन्यांमध्ये झाली नाही. यासाठी काम करावे लागले. तुमच्याकडेही 35 वर्षे खासदारकी होती.तुमच्याकडून या चारीचा एक खडा तरी उचलला गेला का असा सवाल करताना खोट्या नाट्या गोष्टीं सांगून क्रेडिट घेऊ नका असे सुनावले तर सुदैवाने यावष मे महिन्यातच पाऊस चांगला झाला. पाणी लवकर आले याचा सर्वाधिक आम्हाला आनंद आहे.

भोजापुर चारी आम्ही केली असे सांगताना निळवंडे कालव्यावरून नान्नज दुमाला व वरील गावांसाठी तीन पाणीपुरवठा योजना मंजूर केल्या होत्या. त्या कुणी रद्द केल्या असा सवाल त्यांनी विचारला. याचबरोबर तालुक्यातील विविध रस्त्यांसाठी 150 कोटी रुपयांचा निधी मिळवला होता. या रस्त्यांच्या कामाला स्थगिती दिली. यातील 40 कोटींचा निधी हा दुसऱ्या तालुक्यात नेला गेला हे कसे काय झाले. डॉ.तांबे म्हणाले की, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पाण्यासाठी मोठा संघर्ष केला. निळवंडे धरण व कालवे पूर्ण केले.

नान्नज दुमाला, निमोणच्या तीन पाणीपुरवठा योजना का रद्द केल्या
तालुक्यातील प्रत्येक गावाला व शेतकऱ्याला पाणी देण्यासाठी आपण सातत्याने काम केले. पुढील काळातही निळवंडे कालव्याचे पाणी सर्व शेतकऱ्यांना शेततळ्यामधून वर्षातून तीनदा तरी देता येईल अशी नियोजन आपण केले होते. नान्नज दुमाला निमोन या परिसराला पाणी देण्याकरता तीन उपसा सिंचन योजना आपण मंजूर करून ठेवल्या होत्या. मात्र सरकार बदलले आणि त्यांनी या योजना रद्द केल्या. या योजना का रद्द केल्या असा सवाल विचारताना तालुक्यात आता सत्ताधाऱ्याकडून सुरू झालेले सुडाचे राजकारण अत्यंत दुर्दैवी असल्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मंत्री विखे शेतकऱ्यांच्या बांधावर; अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची केली पाहणी, दिले महत्वाचे आदेश..

पाथर्डी | नगर सह्याद्री सोमवारी अहमदनगर शहरासह जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. अनेक भागात अतिवृष्टी...

जीएसटी समितीच्या अहिल्यानगर शहर संयोजकपदी निखिल वारे

अहिल्यानगर | नगर सह्याद्री वस्तू आणि सेवांवरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय सर्वसामान्यांसाठी लाभकारक आहे. पंतप्रधान...

महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर 40 जणांचा आक्षेप, वाचा, सविस्तर

अहिल्यानगर | नगर सह्याद्री महानगरपालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती दाखल करण्यासाठी दिलेल्या अंतिम दिवसापर्यंत (15...

अहिल्यानगर: शिक्षक बनला भक्षक! प्रयोगशाळेत विद्यार्थिनीवर अत्याचार

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:- शिरूर तालुक्यातील इनामगाव येथील एका नामांकित पॉलिटेक्निक महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर...