spot_img
तंत्रज्ञानCNG कारला का लागते आग? 'या' चुकांपासून दूर राहा, कामाची बातमी एकदा...

CNG कारला का लागते आग? ‘या’ चुकांपासून दूर राहा, कामाची बातमी एकदा वाचा..

spot_img

नगर सहयाद्री टीम:-
सीएनजी (कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस) कार चालवणाऱ्या किंवा नवीन सीएनजी कार घेण्याचा विचार करणाऱ्या लोकांनी काही खास खबरदारी घेणे आवश्यक आहे. सीएनजी हा ज्वलनशील वायू आहे आणि याच्या वापरात लहानशा चुकीमुळे वाहनाला आग लागण्याचा धोका असतो. योग्य देखभाल आणि सुरक्षिततेच्या नियमांचे पालन न केल्यास अपघात होऊ शकतो. येथे तीन मुख्य चुका दिल्या आहेत, त्या आपण

स्थानीय बाजारातून सीएनजी किट बसवणे
अनेकजण पैशांची बचत करण्यासाठी स्थानिक बाजारातून सीएनजी किट खरेदी करतात आणि बसवतात. परंतु, हे किट योग्यरित्या बसवले न गेल्यामुळे मोठे अपघात होऊ शकतात. कंपनीद्वारे बसवलेले किट मानकांनुसार तपासलेले असतात. स्थानिक दुकानांमधील किट बसवताना दुर्लक्ष केल्यामुळे गॅस गळती होऊ शकते आणि आगीचा धोका वाढतो. त्यामुळे कंपनी प्रमाणित किटच बसवून घ्यावे.

देखभालीमध्ये निष्काळजीपणा
सीएनजी कारची नियमित देखभाल करणे अत्यंत आवश्यक आहे. वेळोवेळी सीएनजी सिलेंडरची तपासणी करणे, गाडीचे तार आणि इतर भागांची तपासणी करणे गरजेचे आहे. देखभाल न केल्यास अपघात होऊ शकतो. सीएनजी कारची नियमित सर्व्हिसिंग आणि मेंटेनन्स करणे आवश्यक आहे.

सीएनजी सिलेंडर चाचणी
प्रत्येक तीन वर्षांनी सीएनजी सिलेंडरची हायड्रो टेस्टिंग करणे आवश्यक आहे. जर सिलेंडर चाचणीत अयशस्वी ठरला तर त्याचे त्वरित बदल करावे. खराब सिलेंडरमुळे गॅस गळती होऊ शकते आणि आगीचा धोका असतो. त्यामुळे सिलेंडरची नियमित तपासणी करून सुरक्षितता सुनिश्चित करावी.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कोठला झोपडपट्टीत गोमांस विक्री; छाप्यात १८० किलो मांस जप्त, वाचा अहिल्यानगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शासनाने प्रतिबंध केलेल्या गोमांस विक्रीवर तोफखाना पोलीसांनी कोठला झोपडपट्टीत मोठी...

राज्यात थंडीची लाट, तापमान १२.६ अंशांवर; कुठे किती…

मुंबई / नगर सह्याद्री - राज्यात थंडीचा जोर वाढला असून, जळगाव, पुणे आणि नाशिकसह अनेक...

तयारीला लागा! महापालिका निवडणुकीची मोठी अपडेट समोर; आचारसंहिता कधी पहा

मुंबई / नगर सह्याद्री - राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून, पहिल्या टप्प्यातील...

बिबट्या ठार मारा; तरच चिमुकलीवर अंत्यसंस्कार, खारे कर्जुने ग्रामस्थांचा गाव बंदचा निर्णय

खारे कर्जुने ग्रामस्थांचा निर्णय | गाव बंद | शाळा, महाविद्यालय बंद | बिबट्यांनी हादरवला...