spot_img
राजकारणशरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा का दिला होता? काय ठेवली होती अट?...

शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा का दिला होता? काय ठेवली होती अट? अजित पवार यांचा गौप्यस्फोट

spot_img

पुणे / नगर सह्याद्री : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केले. त्यानंतर ते भाजपसोबत गेले. आता सध्या राष्ट्रवादी पक्ष व चिन्ह दोन्हीही अजित पवार यांना देण्यात आले आहे. दरम्यान अजित पवार हे शरद पवार यांच्यावर अनेकदा टीका करताना दिसतात. आता त्यांनी शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा का दिला होता? राजीनामा देताना काय अट ठेवली होती? याबाबतचा मोठा गौप्यस्फोट केलाय.

उपमुख्यमंत्री अजित पवार येथील एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी हा मोठा गौप्यस्फोट केला. मी राजीनामा देतो. सुप्रिया सुळेंना राष्ट्रीय अध्यक्ष करा असं त्यांनी सांगितलं होतं. तेव्हा आम्ही ते मान्य केलं होतं. त्यानंतर त्यांनी न सांगता राजीनामा दिला. पण चार दिवसात काय चक्र फिरली काय माहीत, त्यांनी राजीनामा मागे घेतला, असं अजित पवार म्हणाले. राष्ट्रवादी पक्षाचं अध्यक्षपद आणि पक्षाचा ताबा मिळाल्यानंतर पहिल्यांदाच अजितदादांनी शरद पवार यांच्यावर सार्वजनिक कार्यक्रमातून टीका केली आहे.

असा प्रसंग यायला नको होता
यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना पक्ष वाढवण्याचं आवाहन केलं. बुथ कमिटीची बैठक घ्या. ज्येष्ठांना काम करताना पाहिलं आहे. मला लहान वयातच काम करण्याची संधी मिळाली. सुरुवातीला मला कारखान्यात काम करण्याची संधी मिळाली. १९८७ मध्ये कामाला सुरुवात केली. तरुणांनी एकत्र येऊन प्रयत्न केले. आम्ही प्रेम दिले, वरिष्ठांनी संधी दिली आणि पक्षाने पदे दिली. काम करता करता अनुभव येत गेला. परंतु, आता परिस्थिती बदलली आहे. अजितदादा म्हणाले की, अशी घटना घडायला नको होती पण ते घडले आहे असेही ते म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘महाराष्ट्र केसरी’ साठी महेंद्र गायकवाड, विशाल बनकर, पृथ्वीराज मोहोळ, शिवराज राक्षे, सुदर्शन कोतकरची आगेकूच

तर माऊली जमदाडे, बाला रफिक शेख, हर्षवर्धन सदगीर, हर्षद कोकाटे या दिग्गजांचे आव्हान संपुष्टात अहिल्यानगर...

राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत अहिल्यानगरचे सुरवसे, शेळके, लटके चमकले

अहिल्यानगर / नगर सह्याद्री शहरात सुरु असलेल्या महाराष्ट्र क्सरी कुस्ती स्पर्धे बरोबरच वरिष्ठ गट...

अर्थसंकल्पाआधी शेअर बाजार सुसाट; कोणते शेअर्स तेजीत?

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारामन आज अर्थसंकल्प सादर करणार आहे....

छगन भुजबळ यांचा राष्ट्रवादीला रामराम? दिले संकेत, पुढील वाटचाल…

नाशिक / नगर सह्याद्री - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळाले नाही....