Crime News: बीड आणि परभणीच्या घटनांनी सध्या महाराष्ट्राचे राजकारण ढवळून काढले आहे. महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेचे वाभाडे या घटनांमुळे निघत आहेत. विशेषतः बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी कृत्याच्या ज्या सुरस कथा बाहेर येत आहेत, त्या ऐकल्यानंतर बीड जिल्हा महाराष्ट्रातला बिहार झाला आहे का ? असा प्रश्न सध्या सर्वत्र विचारला जातो आहे.
दरम्यान पुन्हा आता एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. पैसे दे अन्यथा माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव’, असे म्हणत ऊस तोड कामगारांच्या ठेकेदाराने अत्याचार करत. त्याचे फोटो काढले. नंतर सोशल मीडियावर व्हायरल देखील केल्याची घटना घडली.बदनामी व अत्याचाराला कंटाळून पीडितेने विष प्राशन घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. अमोल शिनगारे असे आरोपी ठेकेदाराचे नाव आहे.
सदरची घटना मंगळवार दि.८ एप्रिल रोजी सकाळी घडली. बीड जिल्ह्यातील दिंद्रुड पोलीस हद्दीतील एका गावात ऊसतोड मजूर जोडपे हे अमोल श्रीमंत शिनगारे याच्याकडे ट्रॅक्टरवर कामाला होते. ‘तुमच्याकडे असलेले पैसे दे अन्यथा माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव’, म्हणत अमोल शिनगारे याने जबरदस्तीने अत्याचार केला. त्याने फोटोही काढले. महिलेचे नग्न फोटो काढून भेटायला आली नाहीस तर सोशल मीडियावर व्हायरल करेन, अशा धमक्या तो द्यायचा. त्यामुळे ती इच्छा नसताना त्याचे अत्याचार सहन करत होती. मागील दोन ते तीन वर्षांपासून हे सुरू होतं.
सात महिन्यांपासून महिला भेटण्यास टाळाटाळ करत असल्याचा राग धरून गावातीलच सोशल मीडियावर अमोल शिनगारे याने पीडितेचे नग्न फोटो व्हायरल केले. दरम्यान, हे पीडितेला कळले आणि तिला धक्काच बसला. या सगळ्यांना कंटाळून पीडित महिलेने मंगळवारी सकाळी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. माजलगाव येथील खासगी रुग्णालयात महिलेवर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी गुरुवारी (एप्रिल) पीडितेच्या तक्रारीवरून माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलिस ठाण्यात अत्याचार व अॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.