पारनेर | नगर सह्याद्री:-
नगर जिल्ह्यात व तालुयात यावर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे शेतकरी सुखावला आहे. ही सर्व पंढरपूरच्या पांडुरंगाची कृपा आहे. पंढरीच्या पांडुरंगावर निस्सीम श्रद्धा प्रत्येक शेतकरी वारकर्याची असते. त्यामुळे तो कोणालाही काही कमी पडू देत नाही. असे मत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी व्यक्त केले.
आषाढी एकदाशी निमित्त प्रति पंढरपूर समजल्या जाणार्या पारनेर तालुयातील पळशी येथे विठ्ठल रुमिणीच्या मंदिरामध्ये सुजित झावरे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आषाढी एकादशी निमित्ताने महापूजा करण्यात आली. यावेळी उपस्थित वारकर्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्रातील वारकरी हा खर्या अर्थाने कष्टकरी आहे.
पंढरपूरच्या पांडुरंगावर तो जीवापाड प्रेम करतो. त्यामुळे पांडुरंगाने सर्वांना सुखी समाधानी ठेवावे. हीच आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने मी पांडुरंगाकडे प्रार्थना करतो. असे म्हणत आषाढी एकादशी निमित्ताने झावरे यांनी उपस्थित वारकर्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना ठाकरे पक्षाचे पारनेर तालुकाप्रमुख डॉ.श्रीकांत पठारे हे पळशी या ठिकाणी उपस्थित होते. प्रति पंढरपूर म्हणून पळशी येथील देवस्थान महाराष्ट्रात ओळखले जाते. पळशी या ठिकाणी ऐतिहासिक असे विठ्ठल रुमिणीचे मंदिर आहे. हे देवस्थान जागृत असल्यामुळे या ठिकाणी जिल्ह्यातून व राज्यातून मोठ्या संख्येने भाविक भक्त वारकरी येत असतात.
यावेळी चेअरमन बा.ठ.झावरे, पळशी देवस्थानचे अध्यक्ष मिठू जाधव, पळशी गावचे लोकनियुक्त सरपंच प्रकाश राठोड, उपसरपंच नवनाथ आगिवले, माजी उपसरंपच आप्पासाहेब शिंदे, श्रीरंग रोकडे, युवा नेते विराज पठारे, प्रगतशील शेतकरी भाऊ सैद, माजी चेअरमन दिलीप पाटोळे, ग्रामपंचायत सदस्य नितीन जाधव, अंबरनाथ वाळुंज, गणेश हाके, ठकाजी सरोदे, उद्योजक संदीप गुंजाळ, संतोष जाधव, संतोष सुडके, अमोल जाधव, संपत जाधव, विकास हिंगडे, बाळासाहेब गागरे, उद्योजक रवींद्र ढोकळे, नंदू साळवे, आकाश कोकाटे, रमेश मोढवे, स्वप्निल औटी, बन्सी गागरे, देवदत्त कोकाटे, साहिल कोकाटे, ज्ञानेश्वर कोकाटे, कुणाल डहाळे, अक्षय हिंगडे, मधुकर पठारे, राजेंद्र सुडके, सुरेश घुगे, प्रतीक जर्हाड, चंद्रकांत सुळके, सुनील साळवे, गणेश कोकाटे, संतोष बोरुडे, आदी पळशी येथील ग्रामस्थ तसेच वारकरी विठ्ठल भक्त तसेच श्री मलवीर तरुण मित्र मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पळशीचा पांडुरंग कोणाला पावणार ?
पारनेर तालुयातील प्रति पंढरपूर समजल्या जाणार्या पळशी या ठिकाणी आषाढी एकादशी निमित्ताने महापूजेसाठी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील व शिवसेना (ठाकरे गट) तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे उपस्थित होते. सध्या जवळ येऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकीच्या दृष्टीने दोघेही तयारी करत आहे. पळशी या ठिकाणी उपस्थित राहिल्यामुळे आता पळशीचा पांडुरंग विधानसभेला कोणाला पावणार हे येणार्या काळात समजेल.
देवस्थानला सुजित झावरेंमुळे क वर्ग दर्जा..
प्रति पंढरपूर पळशी येथील देवस्थानला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांच्या पाठपुराव्याने शासनाकडून क वर्ग दर्जा मिळाला आहे. त्यामुळे पळशी येथील देवस्थानचा मोठ्या प्रमाणात विकास झाला असून सुजित झावरे पाटील यांनी आज पर्यंत एक कोटी पेक्षा जास्त निधी देवस्थानला मिळवून दिला. आषाढी एकदाशी निमित्त पारनेर तालुक्यातील पळशी येथील विठ्ठल मंदिरात मोठ्या संख्याने भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. यावेळी भाविकांनी रंगा लावल्या आहे.