spot_img
महाराष्ट्रगृहखाते कुणाला मिळणार? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आठ दिवसांमध्ये...

गृहखाते कुणाला मिळणार? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आठ दिवसांमध्ये…

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री:-
गेल्या काही दिवसांपासून गृह मंत्रालयावरून महायुतीमध्ये वाद असल्याची, एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा सूरू होत्या. देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत स्पष्टीकरण देत शिंदे नाराज नसल्याचे सांगितले आहे. आठ दिवसांमध्ये आमचा मंत्रिमंडळ विस्तार होईल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेय. गृह खाते भाजपकडेच राहील, असेही देवेंद्र फडणवीस यांनी संकेत दिले आहेत.

गृहमंत्रालय आपल्याकडेच ठेवावे, असे भाजपला वाटत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी स्पष्ट सांगितले. एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्रालयावर दावा ठोकला आहे, भाजपकडून गृह खाते देण्यास नकार देण्यात आलाय. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडलाय. भाजपकडून गृह खात्यावरील दावा सोडण्यास नकार देण्यात आलाय. एकनाथ शिंदे यांना दुसरे महत्त्वाचे खाते देण्यास भाजप तयार आहे, पण एकनाथ शिंदे गृह खात्यावर अडून बसल्याचे सांगितले जातेय. या वृत्तावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
अद्याप कोणत्याही खात्याबाबत आग्रह धरण्यात आलेला नाही. खातेवाटपावर आमची चर्चा सुरू आहे. खातेवाटपाचेच बोलायचं झालं तर गृह विभाग नेहमीच आमच्यासोबत आहे. कोणत्याही पोर्टफोलिओसाठी (खाते) चर्चा आवश्यक आहे. परंतु काही पोर्टफोलिओवरील चर्चेसाठी विशेषकरून गृह विभाग नेहमीच आमच्याबरोबर आहे. महायुती म्हणून आम्ही एकत्र आहोत. महायुतीमध्ये चांगला समन्वय आहे. आमचे खातेवाटप, मंत्रिमंडळाची संख्या जवळपास निश्चित झाली आहे. १६ डिसेंबरपूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मराठा आरक्षण; सरकारसमोर मोठं आव्हान; कोर्टात ‘या’ गोष्टी सिद्ध कराव्या लागणार

Maratha Reservation : तर मराठा सामाजासाठी एसईबीसीचा जो मध्यममार्ग सरकारने शोधला होता. त्याचावर वक्रदृष्टी...

विधानसभेतील गद्दारांना योग्य ती शिक्षा मिळणार; खा. लंके यांचे आगामी निवडणुकाबाबत मोठे वक्तव्य

पारनेर । नगर सहयाद्री स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ताकदीने लढवण्याचा निर्धार करत खासदार नीलेश...

शेवगाव, पाथर्डीतील मावा विक्रेत्यांवर छापे; ४ आरोपींना अटक

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव व पाथर्डी तालुक्यांमध्ये चालणाऱ्या बेकायदेशीर मावा व...

२६ गोवंशीय जनावरांची सुटका; पोलिसांनी ‘असा’ लावला सापळा, ३ आरोपींसह मुद्देमाल ताब्यात

अहिल्यानगर । नगर सहयाद्री नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथून कत्तलीसाठी बेकायदेशीरपणे आणलेल्या २६ गोवंशीय जनावरांची...