spot_img
ब्रेकिंगमहाविकास आघाडीचे उमेदवार कोण ठरवणार? 'या’ तीन नेत्यांना दिले अधिकार

महाविकास आघाडीचे उमेदवार कोण ठरवणार? ‘या’ तीन नेत्यांना दिले अधिकार

spot_img

 

Politics News: विधानसभा निवडणुकीचे लवकरच बिगुल वाजण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राजकीय पक्षाची नेतेमंडळी अलर्ट मोडमध्ये पहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी महायुती- महाविकास आघाडी जोरदार तयारी करत आहे.

दरम्यान महाविकास आघाडीत उमेदवार ठरवण्याचा अधिकार नेमका कुणाला आहे. असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तर या प्रश्नावर शरद पवार यांनी मोठे वक्तव्य केले आहे. शरद पवार यांनी मीडियाशी संवाद साधला.

यावेळी शरद पवार म्हणाले, योग्य उमेदवार ठरवण्यासाठी आम्ही तीन लोकांची कमिटी केली आहे. जयंत पाटील, नाना पटोले, संजय राऊत या तीन नेत्यांना निर्णय घेण्याचा, शिफारस करण्याचे अधिकार दिले आहेत. प्रत्येक तालुक्यात जाऊन ही समिती सर्व्हे करणार आहे.

जे लोक निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांच्याबाबतचा लोकांचा कल जाणून घेणार आहेत. जो ओरिजिनल इच्छुक आहे, त्याला काही विचारलं जाणार नाही. तर गावातील सामान्य लोकांची मते जाणून घेतली जाणार आहेत.

तसेच दूध संस्था, सहकारी संस्था आणि इतर संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेऊनच उमेदवार ठरवला जाणार आहे, अशी माहिती शरद पवार यांनी दिली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पालकमंत्री विखेंवर भाजपची मोठी जबाबदारी; कोल्हेंना…

माजी खा. डॉ. सुजय विखे नगर दक्षिणचे, उत्तर नगर जिल्हा माजी आ. स्नेहलता कोल्हे...

राज ठाकरेंमुळे महाविकास आघाडीत फूट? नेमकं काय घडलं पहा

मुंबई / नगर सह्याद्री - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामुळे महाविकास आघाडी फुटणार का?...

पवनचक्कीचे कॉपर केबल चोरणारी टोळी जेरबंद; पोलिसांनी असा लावला सापळा

४ गुन्हे उघडकीस; ५ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त, मुख्य सूत्रधारासह तिघे अटकेत ​अहिल्यानगर /...

​घोसपुरीत दिवसाढवळ्या घरफोडी; दागिन्यांसह मोठा ऐवज लंपास

​अज्ञात चोरट्याविरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; परिसरात भीतीचे वातावरण ​अहिल्यानगर / नगर सह्याद्री...