Exit Polls: गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून काढणाऱ्या विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया बुधवारी पार पडली. विधानसभा निवडणुकीसाठी यंदा राज्यभरात संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी 58.22 टक्के मतदान झाले. ही मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतर आता विविध संस्थांच्या मतदानोत्तर एक्झधिट पोलचे निकाल जाहीर झाले आहेत. यामधून यंदाच्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार, याबद्दल संकेत मिळत आहेत.
महाराष्ट्रात भाजपने सर्वाधिक 149 जागांवर निवडणूक लढवली आहे. शिंदे गटातील शिवसेनेने 81 जागांवर तर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने ५९ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. काँग्रेसने 101 जागांवर, उद्धव गटाच्या शिवसेना (यूबीटी) 95 जागांवर आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने (एसपी) 86 जागांवर उमेदवार आहेत. एक्झधिट पोलच्या अंदाजानुसार, राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होत आहे. महायुतीला 150 ते 170 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आलाय. महाविकास अघाडीला 110 ते 130 जागा मिळू शकतात. तर अन्य आठ ते दहा जागांवर निवडून येतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरणार आहे. त्यांना 89 ते 101 जागा मिळू शकतात. शिंदे गटाला 37 ते 45 जागा मिळू शकतात. तर अजित पवारांना 17 ते 26 जागा मिळू शकतात. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरेल, असा अंदाज आहे. काँग्रेसला 39 ते 47 जागा, शिवसेनेला (यूबीटी) 21 ते 29 जागा आणि शरद पवार यांच्या पक्षाला 35 ते 43 जागा मिळू शकतात.
भाजप – 89 – 101
शिंदे शिवसेना – 37-45
राष्ट्रवादी अजित पवार – 17-26
काँग्रेस 39 – 47
ठाकरे गट – 21-19
राष्ट्रवादी शरद पवार गट – 35-43
महायुती – 150-170
मविआ – 110 -130
इतर – 8 – 10