spot_img
देशIPL 2025 चा किंग कोण? RCB vs PBKS...

IPL 2025 चा किंग कोण? RCB vs PBKS…

spot_img

नगर सह्याद्री वेब टीम
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेतील अंतिम सामना आज (०३ जून) पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या दोन संघांमध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्याआधी क्रिकेट चाहत्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. कारण या सामन्यावर पावसाचं सावट आहे. त्यामुळे सामना रद्दही होऊ शकतो. याआधी क्वालिफायर २ सामना देखील पावसामुळे रखडला होता. रात्री उशिरापर्यंत सामना सुरू न झाल्यामुळे अनेकांच्या चिंता वाढल्या होत्या. अहमदाबादेतील सध्याचं वातावरणही तसंच असल्यामुळे क्रिकेटरसिकांची चिंता वाढली आहे.

दरम्यान, या सामन्यापूर्वी आपण दोन्ही संघांची उजळणी करणार आहोत. हा सामना किती वाजता, कुठल्या मैदानात खेळवला जाणार आहे? हा सामना कुठे पाहता येईल? दोन्ही संघांची प्लेइंग ११ कशी असेल? तसेच इतर प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत.

दोन्ही संघ पहिल्या जेतेपदाच्या प्रतीक्षेत
पंजाब किंग्ज संघाची धुरा श्रेयस अय्यरकडे आहे. तर, रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या कर्णधारपदाची जबाबदारी रजत पाटीदारकडे आहे. दोन्ही संघ आपल्या पहिल्या जेतेपदाच्या प्रतीक्षेत आहेत. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने क्वालिफायर १ मध्ये पंजाब किंग्जला पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. तर दुसरीकडे पंजाब किंग्जने क्वालिफायर २ मध्ये मुंबई इंडियन्सला धूळ चारत अंतिम सामना गाठला आहे.

सामना कधी व कुठे खेळवला जाणार? थेट प्रक्षेपण कुठे पाहता येईल?
हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार असून संध्याकाळी ७.३० वाजता खेळाला सुरुवात होईल. स्टार स्पोर्ट्स या वाहिनीवर ७.३० वाजल्यापासून या सामन्याचं थेट प्रक्षेपण होईल. तसेच जिओ हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवरही तुम्ही हा सामना लाइव्ह पाहू शकता.

अशी असेल पंजाब किंग्सची प्लेइंग ११
प्रियांश आर्या, जॉश इंग्लिस (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहाल वढेरा, मार्कस स्टॉयनिस, शशांक सिंह, अझमतुल्लाह ओमरझाई, काईल जेमिसन, विजयकुमार वैशाख, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल आणि इम्पॅक्ट प्लेअर – प्रभसिमरन सिंग

अशी असेल पंजाब किंग्सची प्लेइंग ११
विराट कोहली, फिलिप सॉल्ट, रजत पाटीदार (कर्णधार) लियाम लिविंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रोमारियो शेफर्ड, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, यश दयाल, जोश हेझलवूड, सुयश शर्मा आणि इम्पॅक्ट प्लेअर – मयांक अग्रवाल

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शेतकऱ्यांना आनंदाची खबर! PM-KISAN योजनेचा हप्ता जमा? पैसे आले की नाही, असे करा चेक..

PM-KISAN: देशातील ९.७ कोटी शेतकऱ्यांसाठी आज एक मोठी दिलासादायक बातमी आहे. केंद्र सरकारच्या पंतप्रधान...

नवीन कृषिमंत्र्यांचे वादग्रस्त विधान! महसूल दिनाच्या कार्यक्रमात काय घडलं?

Agriculture Minister Controversy: माणिकराव कोकाटे यांची कमतरता नवीन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अवघ्या २४...

लाडक्या बहि‍णींना रक्षाबंधनाची भेट! जुलैचा हप्ता जमा होणार? आदिती तटकरेंनी सांगितली तारीख

Ladki Bahin Yojana: राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांसाठी एक आनंदाची बातमी...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशीच्या जीवनात होणार ‘मोठा’ बदल

मुंबई । नगर सह्याद्री– मेष राशी भविष्य आपल्या पालकांकडे दुर्लक्ष करणे हे आपल्या भविष्यातील प्रगतीसाठी मारक...