spot_img
ब्रेकिंगAhmednagar News: माजी मंत्र्याच्या आशीवार्दाने वाळूचा 'गोडवा' कोणी चाखला? 'या' गावच्या ग्रामस्‍थांचा...

Ahmednagar News: माजी मंत्र्याच्या आशीवार्दाने वाळूचा ‘गोडवा’ कोणी चाखला? ‘या’ गावच्या ग्रामस्‍थांचा संतप्त सवाल

spot_img

राहाता । नगर सहयाद्री-
माजी महसूल मंत्र्याच्या आशीवार्दाने मुळा, प्रवरा नदी पात्रातील वाळूचा ‘गोडवा’ यापुर्वी कोणी चाखला हे जनता जाणून आहे. आपणच निर्माण केलेल्या माफीयामुळे मुळा, प्रवरा नदी उध्वस्त होत होती तेव्हा तुमचे निसर्ग प्रेम कुठे गेले होतेॽ असा सवाल सोनगाव सात्रळ आणि धानोरे परीसरातील ग्रामस्‍थांनी केला आहे.

यासंदर्भात प्रतापराव कडू, वसंतराव डुक्रे, आप्‍पासाहेब दिघे, पाराजी धनवट, सुभाष अंत्रे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, यापूर्वी वाळू माफीया आणि दलाल निर्माण करणा-यांना अचानकपणे मुळा, प्रवरा नदी बद्दल निसर्ग प्रेम उफाळून यावे हे अतिशय हास्यास्पद आहे. राज्यात आणि संपूर्ण नगर जिल्‍ह्यात कोणाच्या आशीवार्दाने वाळू माफीया आणि दलाल निर्माण झाले हे जनतेला चांगले माहीती असल्याने तुम्ही कितीही स्वत:चे पाप झाकण्याचा प्रयत्न केला तरी माफीयांना पाठीशी घालणारे कोण होते हे आता बेगडी निसर्ग प्रेम दाखवून लपून राहणार नाही.

आपले मेव्‍हने महसूल मंत्री असताना त्यांच्या नावाखाली मुळा, प्रवरा नदीपात्रातून वाळू तस्करी करण्यास कोण पुढे होते हे जनतेने उघड्या डोळ्यानी पाहीले तेव्हा तुम्‍हाला मुळा व प्रवरा नदीची काळजी वाटली नाही. तेव्‍हा तुमचे निसर्ग प्रेम कुठे गेले होते? असा सवाल करतानाच एकीकडे निसर्गप्रेम दाखवायचे आणि दुसरीकडे संगमनेर तालुक्यात क्रशरच्या माध्यमातून नैसर्गिक संपत्‍तीची नासधूस करायची हा तुमचा दुटप्पीपणा न समजण्या इतकी जिल्‍हयातील जनता दूधखुळी नाही. आपल्या मुलाला कोट्यावधी रुपयांचा झालेला दंड हेच तुमच्या मनातील शल्य असून, तुमच्या आंदोलना मागील बोलविता धनी सुध्दा संगमनेरातच असल्याचे आता लपून राहीले नसल्याचा टोला पत्रकातून लगावण्यात आला.

महसूल मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या माध्‍यमातून राज्‍यात वाळु धोरण जाहीर झाल्‍यानंतर सामान्‍य माणसाला अतिशय कमी दरात वाळू उपलब्‍ध होत आहे. या व्यवसायातील माफीया आणि दलाल यांना मोठी चपराक बसली आहे. तसेच अवैध वाळु व्यवसायावर आलेल्या बंदीमुळेच तुमची आणि तुमच्‍या बगलबच्‍चांची अस्वस्थता आता समोर येवू लागली असून, ज्यांनी नदीपात्र उध्वस्त केले त्‍या माफीया आणि दलालांना घेवूनच तुम्ही करीत असलेले आंदोलन म्हणजे ‘चोर तो चोर वर शिरजोर’ असाच काहीसा केविलवाणा प्रकार जनतेने ओळखल्याने आपले आदोलन म्हणजे फक्त नौटकी असून त्याला जनता थारा देणार नाही असे पत्रकात शेवटी म्‍हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...