spot_img
अहमदनगरसिस्पेतील चोरांना पाठीशी घालणारा मोर कोण?; डॉ. विखेंनी साधला खा. लंकेंवर निशाणा

सिस्पेतील चोरांना पाठीशी घालणारा मोर कोण?; डॉ. विखेंनी साधला खा. लंकेंवर निशाणा

spot_img

ठेवीदारांच्या पैशासाठी उपोषण का केले नाही? नामोल्लेख टाळत थेटपणे खा. नीलेश लंके यांच्यावर निशाणा
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
नगर शहरासह श्रीगोंदा, पारनेर तालुक्यातील सामान्य जनतेला हजार कोटींपेक्षा जास्त रकमेला गंडविणार्‍या सिस्पे आणि इन्फीनीटी या कंपनीचे, तिच्या संचालकांचे कौतुक करणारे, जनतेला या कंपनीत गुंतवणूक करण्यास सांगताना ही मंडळी माझी नातेवाईक असल्याचे सांगणारे आता कोणत्या बिळात जाऊन बसले आहेत? सिस्पेचा चालक नातेवाईक असल्याचे सांगणार्‍यांनी आता तो चालक पळून गेल्याने जनतेच्या हजार कोटींची जबाबदारी घ्यावी. जनतेचे कष्टाचे, घामाचे पैसे अडकले असताना त्यांचे पैसे मिळण्यासाठी आता हे का आंदोलन करत नाहीत, उपोषण का करत नाहीत, रस्त्यावर का उतरले नाहीत, पोलिस ठाण्यासमोर का बसले नाहीत याचे उत्तर त्यांना द्यावेच लागेल अशा शब्दांमध्ये माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी खासदार निलेश लंके यांचा नामोल्लेख टाळत त्यांच्यावर हल्लाबोल केला.

नगर शहरात आयोजित एका सार्वजनिक कार्यक्रमात डॉ. सुजय विखे यांनी अत्यंत आक्रमक होत सिस्पे आणि इन्फीनीटी या दोन कंपन्यांमध्ये हजारो कोटींची फसवणूक झाल्याचा मुद्दा उपस्थित केला आणि त्या फसवणुकीची जबाबदारी ज्यांनी उदघाटन केले त्यांनीच घ्यावी असा टोला त्यांनी लगावला. यावेळी डॉ. सुजय विखे पाटील सिस्पे प्रकरणाचा उल्लेख करताना म्हटले की, सिस्पे या शेअर मार्केट ट्रेडिंग कंपनीचे उद्घाटन लोकप्रतिनिधीच्या हस्ते संपन्न झाले होते, तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांना गाड्यांचे वाटप देखील करण्यात आले होते. परिणामतः, या कंपनीने गोरगरिब शेतकर्‍यांकडून हजारो कोटी रुपये उकळवले आणि फरार झाली. हा प्रकार म्हणजे दिवसाढवळ्या टाकलेला दरोडाच असून, याची संपूर्ण जबाबदारी उद्घाटन करणार्‍या लोकप्रतिनिधीने घ्यावी. ते पुढे म्हणाले, आपला लोकप्रतिनिधी जर अशा फसव्या कंपन्यांचे उद्घाटन करत असेल, तर जनतेला त्यावर विश्वास बसणारच. जनता कर्ज काढून पैसे गुंतवणार हे अपेक्षितच आहे. त्यामुळे अशा प्रकारात उद्घाटन करणार्‍या त्या लोकप्रतिनिधीची जबाबदारी ठरतेच. यासोबतच जिल्ह्यातील प्रलंबित प्रकल्प आणि विकासकामांचा अभाव या मुद्द्यांवर देखील त्यांनी सवाल उपस्थित केले. मी खासदार असताना वेळेआधी प्रकल्प पूर्ण केले, मात्र गेल्या तीन वर्षांत जिल्ह्यात एकही महत्त्वाचा केंद्र सरकारचा प्रकल्प आला नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

डीवायएसपी भोसलेंकडून रक्कम वसुल करुन देण्याची मागणी!
सिस्पेच्या सुप्यातील कार्यक्रमाला खा. निलेश लंके यांच्यासोबत डीवायएसपी भोसले हे खाकी वर्दी घालून हजर होते. त्यांनी देखील त्यांच्या भाषणात नवनाथ औताडे हे त्यांचे नातेवाईक, मित्र असल्याचे सांगून जनतेला गुंतवणुकीस प्रवृत्त केले होते. भोसले हे सेवानिवृत्त झाले असले तरी त्यांनी पोलिस अधिकारी असतानाही जनतेला सिस्पेमध्ये गुंतवणूक करण्यास कसे काय सांगितले? गुंतवणूकीत फसवणूक झालेल्यांना त्यांची रक्कम भोसले यांच्याकडून वसूल करुन द्यावी अशी मागणीही आता पुढे आली आहे.

हजार कोटींचा दिवसा टाकलेला दरोडा
सिस्पेचा चालक नातेवाईक असल्याचे जाहीरपणे भाषणात सांगणार्‍या लोकप्रतिनिधीमुळे जनतेने गुंतवणूक केली. त्यात हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम अडकली. सिस्पेचा घोटाळा म्हणजे नगरमध्ये दिवसा टाकण्यात आलेला दरोडाच असल्याकडेही डॉ. सुजय विखे पाटील यांनी लक्ष वेधले.

श्रीगोंदा, नगर शहर, पारनेरमधील हजारो कोटी सिस्पेत
सिस्पेच्या उदघाटनाला कोण होते? त्या कंपनीच्या संचालकांच कौतुक कोणी जाहीरपणे केले? कंपनीचे चालक नातेवाईक, मित्र असल्याचे कोणत्या लोकप्रतिनिधींनी जाहीरपणे व्यासपीठावर सांगितले? त्या कंपनीचे एजंट कोण होते? त्यांच्या मोटारसायकली कोणी वाटल्या? असे अनेक प्रश्न सुजय विखे पाटील यांनी यावेळी उपस्थित केले. श्रीगोंदा, नगर शहर आणि पारनेरमधील हजारो गुंतवणूकदारांचे हजारो कोटी सिस्पेत गुंतवले गेले आणि त्याला जबाबदार असणारे आज त्यावर शब्द का बोलत नाहीत असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

सिस्पेच्या सुत्रधाराला दिल्लीत कोण घेऊन गेले?
सिस्पेचे पैसे मिळावे म्हणून आंदोलन का झाले नाही, उपोषण का केले नाही, रस्त्यावर का उतरले नाही, पोलिस ठाण्यासमोर का बसले नाहीत या प्रश्नांचे त्यांना (निलेश लंके) उत्तर द्यावेच लागेल. सिस्पेचा सुत्रधार कोण आहे हे सर्वश्रूत आहे. सिस्पेच्या त्या ठगाला दिल्लीला कोण घेऊन गेले याचे उत्तर मिळाले पाहिजे अशी आग्रही मागणी यावेळी डॉ. सुजय विखे पाटील यांनी केली.

सिस्पेच्या दरोड्यात श्रीगोंदेकरांचे पाचशे कोटी गेले!
मागील लोकसभा निवडणुकीत चाळीस हजार मतांचा लिड श्रीगोंदेकरांनी ज्यांना दिला, त्यांनीच सिस्पेचा जन्म घातला. सिस्पेच्या या दरोड्यात श्रीगोंदेकरांचे पाचशे कोटी लुटले गेले. ज्यांनी लुटले आणि ज्यांच्या माध्यमातून लुटले हे आता स्पष्टपणे समोर आले आहे. सिस्पेचा हा दरोडा श्रीगोंद्याला पाचशे कोटी लुटणारा ठरला असल्याचा हल्लाबोल करताना याबाबत थेट श्रीगोंद्यात जाऊन सविस्तर बोलणार असल्याचही विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्याबाहेर काय चालू आहे, हे योग्य वेळी बोलेल!
हजार कोटींचा दिवसाढवळ्या दरोडा पडला असताना आणि लोकप्रतिनिधी म्हणून जिल्ह्याची जबाबदारी असताना त्यांचे काम जिल्ह्याबाहेर चालू असल्याचे विखे पाटील यांनी नमूद करताच व्यासपीठासह सभेतील उपस्थितांमध्ये हशा पिकला. बाहेर काय चालू आहे हेही मी योग्य वेळी बोलेल असा चिमटा विखे पाटील यांनी काढताच पुन्हा हशा पिकला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरमध्ये बंद घर फोडले; अडीच लाखांचे दागिने लांबविले

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - श्रीकृष्णनगर, केडगाव येथील प्लॉट क्रमांक ३० येथे अज्ञात चोरट्याने घरफोडी...

धक्कादायक; बँक कर्मचार्‍याने १२ तोळे सोने लांबविले, कुठे घडला प्रकार पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री : नगरमध्ये बँक कर्मचार्‍यांने १२ तोळे सोने लंपास केल्याची प्रकार उघडकीस...

दोन लेकरांसह आईची विहिरीत उडी; तिघांचाही मृत्यू, नगरमधील घटना

जामखेड तालुक्यातील नायगाव येथील धक्कादायक घटना जामखेड | नगर सह्याद्री रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी जामखेड तालुयातील नायगाव...

बोगस मतदारांच्या आरोपावरून विखे-थोरात भिडले, काय म्हणाले पहा

शिर्डी | नगर सह्याद्री बोगस मतदानाबाबत राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले...