spot_img
महाराष्ट्रमहाराष्ट्राचे गृहमंत्री कोण? शिंदे गटाला कुठले खाते मिळणार?; राजकीय वर्तुळातील मोठी बातमी...

महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण? शिंदे गटाला कुठले खाते मिळणार?; राजकीय वर्तुळातील मोठी बातमी समोर..

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री:-
राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीने जोरदार मुसंडी मारून महाविकास आघाडीला धूर चारत पुन्हा एकदा सत्तेत येण्याचा मान मिळवला आहे. महायुतीतील तिन्ही पक्षांनी एखत्रितपणे 230 जागा जिंकल्या आहेत. दरम्यान महाराष्ट्रात मंत्री कोण कोण होणार? याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. पालकमंत्री आणि मंत्रिपदावरुन महायुतीमध्ये रस्सीखेच सुरु आहे.पण सूत्रांच्या माहितीनुसार, कुणाला कोणती मंत्रि‍पदे मिळू शकतात, याची माहिती समोर आली आहे.

मंत्रि‍पदासाठी महायुतीमध्ये अनेकांनी फिल्डिंग लावली आहे. अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आज दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. अमित शाह यांच्यासोबत राज्यातील मंत्रिमंडळावर चर्चा होणार आहे. महायुतीमधील वाटाघाटी दिल्लीमध्ये ठरणार आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्रिपद भाजपकडे राहणार आहे. भाजप गृहमंत्रालय आपल्याकडेच ठेवणार आहे. तर अजित पवार यांच्या राष्ट्रावादीकडे अर्थ खाते जाणार आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

भाजपकडे कोणती खाती?
मुख्यमंत्री, गृहमंत्री, सामाजिक बांधकाम, जलसंपदा, वैदकीय, वने, आरोग्य, उच्चशिक्षण, उर्जा, सहकार, शिवसेनेला

कोणती खाती जाणार?
नगरविकास, एमएसआरडीसी, पाणीपुरवठा, उदयोग, आदिवासी,

अजित पवारांकडे कोणती खाती?
अर्थमंत्रालय, महसूल, कृषी,  ग्रामविकास, महिला बालविकास

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेर राजकीय कुस्त्या लावण्यासाठी माहीर ; डॉ. सुजय विखे पाटील नेमकं काय म्हणाले पहा…

  बाबासाहेब तांबे सोशल फाउंडेशनच्या आखाड्याचा जिल्ह्यात नावलौकिक पारनेर | नगर सह्याद्री अंबिका माता यात्रा उत्सवा निमित्ताने...

रंजित कासले प्रकरणात मोठं ट्विस्ट; ‘त्या’ 10 लाख रुपयांबाबत धक्कादायक खुलासा, अडचणीत वाढ

बीड / नगर सह्याद्री मोठी बातमी समोर येत आहे, निलंबित पोलीस अधिकारी रंजित कासले...

पावसाचा पहिला अंदाज आला! राज्यात ‘या’ तारखेला कोसळणार?

Weather Update: -भारतीय हवामान विभागाने २०२५ च्या मान्सून २०२५ च्या हंगामासाठीचा आपला अंदाज जाहीर...

‘राष्ट्रवादीचे सभासद नोंदणीतून बळ वाढणार’; टाकळी ढोकेश्वर गटातून अभियानाला सुरुवात

पारनेर | नगर सह्याद्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभासद नोंदणी अभियानाला पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर जिल्हा...