spot_img
राजकारणअजित पवारांना कोण खेळवतय ? की तेच खेळवतायेत ? दादांनी सुपुत्र पार्थ...

अजित पवारांना कोण खेळवतय ? की तेच खेळवतायेत ? दादांनी सुपुत्र पार्थ पवार यांना डावलून ‘यांना’ दिली संधी, चर्चांना उधाण

spot_img

पुणे / नगर सह्याद्री : राष्ट्रवादी काँग्रेस व शरद पवार हे पक्के समीकरण होते. परंतु अजित पवारांनी बंड केले व राष्ट्रवादीत दोन गट पडले. अजित पवार यांनी पक्षाच्या एका गटाची सूत्रे आपल्या हातात घेतली. त्यानंतर मात्र बारामती लोकसभा मतदार संघातून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरु झाली.

तसेच पार्थ पवार यांची राजकारणात एन्ट्री सहकाराच्या माध्यमातून होणार असं वर्तवलं जाऊ लागलं. त्याच कारण असं की, उपमुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतर अजित पवार यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाचा राजीनामा दिला होता. येथे आता पार्थ यांची निवड होणार असल्याचे म्हटले जात होते. परंतु अजित पवार यांनी घराणेशाही ऐवजी विश्वासू व्यक्तीला संचालक केले आहे.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी रणजित अशोक तावरे यांची बुधवारी नियुक्ती झाली. रणजित तावरे हे अजित पवार यांचे विश्वासातील आहे. पुणे जिल्ह्यातील मालेगाव बुद्रुक येथील ते रहिवाशी आहेत. जिल्हा बँकेच्या संचालकपदावर पार्थ पवार यांना पाठवण्याऐवजी रणजित तावरे यांची निवड अजित पवार यांनी केली. बुधवारी झालेल्या बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

या खेळीमुळे पुन्हा चर्चांना उधाण आले आहे. अजित दादा नेमके काय राजकीय खेळ खेळतायत हे कुणाला सध्या समजत नाहीये. त्यामुळे अजित पवारांना कोण खेळवतय का अशी चर्चच आहे. परंतु त्यांची पोवई सर्वाना माहित आहे त्यामुळे त्यांना कुणी खेळणार नाही तर तेच इतरांना खेळवतायेत अशीही चर्चा आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

प्रतीक्षा संपली! महाराष्ट्र मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, कोणाला कोणते खाते मिळाले, पहा संपूर्ण यादी

मुंबई / नगर सह्याद्री - Maharashtra Portfolio Allocation : मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खाते वाटप...

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...