spot_img
राजकारणराज्यसभेचे उमेदवार, फडणवीसांचे शिलेदार अजित गोपछडे आहेत तरी कोण? जाणून घ्या..

राज्यसभेचे उमेदवार, फडणवीसांचे शिलेदार अजित गोपछडे आहेत तरी कोण? जाणून घ्या..

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री : आगामी राज्यसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरु आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांना भाजपात घेत भाजपने त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली. दरम्यान भाजपने आणखी दोन उमेदवार दिले पैकी मेधा कुलकर्णी हे नाव देखील सर्वपरिचित आहे. परंतु भाजपचा तिसरा उमेदवार डॉ. अजित गोपछडे यांना राज्यसभेची उमेदवारी दिली. तर ते नमक कोण आहात याबाबत अनेकांना उत्सुकता आहे.

कारसेवक ते वैद्यकीय सेवक
डॉ. अजित गोपछडे हे नांदेडचे शहरातील एमडी डॉक्टर असून, त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत काम केले आहे. त्यातून रा. स्व. संघाशीही त्यांचा जवळचा संबंध आहे. तसेच, मागच्या भाजपच्या सत्ताकाळात त्यांची तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक वाढली.

त्यातच, ते लिंगायत समाजातून येत असल्याने भाजपाने नांदेडसह लातूर, धाराशिव येथील लिंगायत समाजाच्या मतदारांना आकर्षित करत ‘सोशल इंजिनिअरिंग’ साधले आहे. दरम्यान, राम मंदिर आंदोलनातही १९९२ साली कारसेवक म्हणून त्यांनी सहभाग घेतला होता. त्यावेळी, ते २२ वर्षांचे होते. अजित गोपछेडे हे भाजपाच्या डॉक्टर्स आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राहिले आहेत. तसेच, नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे राज्यपाल नियुक्त सदस्यही आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्यानगरमध्ये खळबळ! मतपेट्या आणलेल्या बसमध्ये सापडले नोटांचे बंडल

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यातील कोपरगाव येथील हि घटना असून मतदानाच्या दुसऱ्या दिवशी चक्क एसटी...

उमेदवारांची धाकधूक वाढली! नगरमध्ये कुणाच्या अंगावर पडणार गुलाल…

विधानसभेच्या परिक्षेचा शनिवारी निकाल | समर्थकांकडून गुलालाची तयारी | चौकाचौकात दावे प्रतिदावे अहिल्यानगर | नगर...

भावी मुख्यमंत्री बाळासाहेब थोरात; संगमनेरमध्ये झळकले फ्लेक्स

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले असून आता वेध लागलेत ते निकालाचे....

शेतात कापूस वेचणाऱ्या महिलेवर बिबट्याचा प्राणघातक हल्ला; कुठे घडली घटना

छत्रपती संभाजीनगर । नगर सहयाद्री:- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणच्या वडजी येथील एका 31 वषय महिलेवर...