spot_img
ब्रेकिंगशिरुरचा सामना ठरला! खासदार कोल्हे यांच्या विरोधात कोण? 'यांचा' अजित पवार गटात...

शिरुरचा सामना ठरला! खासदार कोल्हे यांच्या विरोधात कोण? ‘यांचा’ अजित पवार गटात प्रवेश

spot_img

शिरुर | नगर सह्याद्री
गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये सुरू असलेला शिरुर लोकसभेच्या उमेदवारीचा तिढा अखेर सुटला असून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. २६ मार्चला आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होणार आहे. शिरुरमध्ये बदला घेण्यासाठीच लढणार असून महायुतीचा उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होईल, असा विश्वास आढळराव पाटील यांनी व्यक्त केला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून शिरुर लोकसभेच्या उमेदवारीवरुन महायुतीमध्ये जोर- बैठका सुरू होत्या. शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे शिरुरमधून लढण्यास इच्छुक होते. मात्र शिरुरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडे असल्याने आढळराव पाटील यांना घड्याळ चिन्हावर निवडणूक लढण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता.

अखेर आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असून २६ मार्च रोजी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हेंना पाडणारचं, असे थेट आव्हान दिल्याने ही निवडणुक राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. त्यामुळे शिरुरमध्ये हायहोल्टेज सामना रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

उमेदवार आयात करावं लागणं हे माझे यश: खा. कोल्हे
दरम्यान, माजी खासदार आढळराव पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर खासदार अमोल कोल्हे यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. शिरुरमध्ये बेडूक उड्या विरुद्ध एकनिष्ठता अशी लढत आहे. आढळराव पाटील यांना चौथ्या पक्ष प्रवेशाच्या मनपूर्वक शुभेच्छा. राजकीय ताकदवान नेत्यांना उमेदवार आयत करावे लागणं हेच माझे यश आहे, असे ते म्हणालेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...

मुख्याध्यापक लंके यांची बदली रद्द करा; रयतच्या कार्यालयासमोर पालकांचे धरणे आंदोलन

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक विभागाचे कार्यरत मुख्याध्यापक...

उद्धव-राज एकत्र येणार; पाच जुलैला मुंबईत..

मुंबई । नगर सहयाद्री  महाराष्ट्रातील विरोधी पक्षांचा आक्रमक पवित्रा पाहून देवेंद्र फडणवीस सरकारने हिंदी सक्तीचा...

जामखेडमध्ये धक्कादायक प्रकार! पुन्हा एका बालकाचा मृत्यू; आठ दिवसांतील तिसरी घटना..

जामखेड । नगर सहयाद्री:- क्रिकेट खेळताना स्लॅबवरती गेलेला बॉल फ्लेसच्या लोखंडी पाईपने काढत असताना घरावरील...