spot_img
ब्रेकिंगबॉम्बस्फोट नक्की कोणी घडवला?; सरकारला उत्तर द्यावेच लागणार...

बॉम्बस्फोट नक्की कोणी घडवला?; सरकारला उत्तर द्यावेच लागणार…

spot_img

विशेष संपादकीय । शिवाजी शिर्के:-
मुंबईतील साखळी बाँब स्फोटातील सर्व आरोपींना निर्दोष सोडल्यानंतर राज्य आणि केंद्र सरकारने आश्चर्य व्यक्त केले आणि या निर्णयाच्या विरोधात सुप्रिम कोर्टात धाव घेतली. आता मालेगाव बाँबस्फोट खटल्याचा निकाल समोर आला आणि या निकालानुसार मालेगाव बाँबस्फोटातील सातही आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलीय. यावर अनेक प्रतिक्रिया उमटत असताना मुंबई- मालेगाव या दोन्ही ठिकाणी बाँबस्फोट झाले आणि त्यात अनेकांचे जीव गेले. पोलिसांनी पकडलेले आरोपी निर्दोष सुटले असतील तर मग हे दोन्ही बाँबस्फोट नक्की कोणी केले, याचे उत्तर सरकारला द्यावेच लागणार आहे.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात आज एनआयएच्या विशेष न्यायालयाने आज ऐतिहासिक निकाल सुनावत सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. केवळ संशयामुळे आरोपींना दोषी धरता येणार नाही, असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे. तब्बल 17 वर्षांनंतर आलेल्या या निकालाने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत आणि त्यातील सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे आरोपी निर्दोष सोडले जात असतील तर हा बाँबस्फोट नक्की कोणी घडवला? ज्यांच्यावर आरोप करत जेलमध्ये टाकण्यात आले, त्यांची उमेदीची 17 वर्षे तुरुंगात गेली, त्याचे काय? मालेगाव बाँबस्फोट खटल्याचा तपास हेमंत करकरे यांच्याकडे होता.

देशातील एक चांगले अधिकारी अशी हेमंत करकरे यांची ओळख होती. पण दुर्दैवाने नंतर त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी हे सगळं प्रकरण बाहेर काढलं होतं. मात्र त्यांची हत्या करण्यात आली. हिंदू दहशतवाद हा शब्द मालेगाव घटनेच्या नंतर समोर आला होता. एका समाजात दहशत निर्माण करण्यासाठी आणि समाजात धार्मिक दुफळी निर्माण करण्यासाठी मालेगावमध्ये बॉम्बस्फोट करण्यात आला असाही आरोप झाला. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर खरंच निर्दोष असत्या तर त्यांना तुरुंगात टाकण्याची हिंमत कोणामध्ये होती? तसंच आजच्या निकालाप्रमाणे तेव्हा आमत सक्रिय असणारे लेफ्टनंट कर्नल पुरोहित यांना कोणी अडकवलं? याचाही शोध घेण्याची गरज आहे.

दहशतवाद हा भगवा नव्हता आणि ना कधी राहणार, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. देवेंद्रजींची ही प्रतिक्रिया खूपच बोलकी आहे. हिंदू दहशतवाद हा शब्द या निकालाने खोडून काढला असला तरी बाँबस्फोट कोणी केले याचे उत्तर राज्याचे गृहमंत्री या नात्याने शोधण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली नाही. दहशतवादाला कोणताच रंग नव्हता आणि नाही. भगवा- हिरवा दहशतवाद हे फक्त दोन समाजात दूही माजविण्यासाठीच वापरले जाणारे शब्द! मुंबई आणि मालेगावमध्ये बाँबस्फोट घडले हे वास्तव सत्य आहे आणि त्यात अनेकांचेे जीव गेले, अनेक कुटुंब रस्त्यावर आली आणि अनेकांना अपंगत्व प्राप्त झाले. न्यायालयाने न्याय देण्याची भूमिका बजावली. बाँबस्फोटातील सारेच आरोपी निर्दोष सुटले असतील तर बाँबस्फोट कोणी केले याचे उत्तर मिळण्याची गरज आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

निघोज येथील ‘अन्नत्याग आंदोलन’ आश्वासनानंतर स्थगित; आ दाते नेमकं काय म्हणाले? वाचा..

कांदा भाववाढीसाठी सरकार सकारात्मक; निर्यातबंदी लवकरच उठेल आ. काशिनाथ दाते । निघोज येथील अन्नत्याग आंदोलन...

अहिल्यानगरमध्ये राडा! १५ जणांच्या टोळक्याचा तरुणावर गँगस्टर हल्ला; सीसीटीव्हीत प्रकार झाला कैद!, पहा काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री नगर तालुक्यातील कामरगाव शिवारात जुन्या कोर्ट प्रकरणातील वैरातून अन्सार रहीम...

पत्नीचा कुर्‍हाडीने घेतला जीव! भल्या पहाटेच शहरात भयंकर प्रकार..

संगमनेर | नगर सहयाद्री :- तालुक्याच्या पठारभागातील घारगाव येथे चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीचा...

माणिकराव कोकाटे यांना ‘धक्का’!; राज्याला मिळाले नवे कृषीमंत्री, वाचा सविस्तर

मुंबई | नगर सहयाद्री राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात अखेर फेरबदल झाला. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे...