spot_img
अहमदनगर'सुजय विखे यांनी पारनेर विधानसभा लढवावी', कोणी केली मागणी? पहा..

‘सुजय विखे यांनी पारनेर विधानसभा लढवावी’, कोणी केली मागणी? पहा..

spot_img

पारनेर । नगर सहयाद्री:-
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात सुजय विखे यांचे मोठे संघटन असून त्यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पारनेर मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी आता कार्यकर्त्यांकडून मागणी करण्यात येत आहे. पारनेर नगर विधानसभा मतदारसंघात सुजय विखे यांनी कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी विधानसभा निवडणूक लढवावी अशी मागणी भाजपा किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी रोकडे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे.

खासदार सुजय विखे यांचे पारनेर नगर विधानसभा मतदारसंघात मोठा कार्यकर्त्यांचा समूह आहे. परंतु एका मंचावर सर्वांना जमा करून माजी खासदार सुजय विखे यांनी निवडणूक लढविल्यास सुजय विखे पारनेर विधानसभा मतदारसंघात आमदार होतील व खऱ्या अर्थाने लोकसभेला झालेल्या पराभवाचा बदला घेतल्याचे समाधान कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येईल असं मत जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी रोकडे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

पारनेर नगर विधानसभा मतदारसंघात खासदार असताना त्यांनी अनेक विकासाची कामे मार्गी लावली आहेत त्या विकास कामांच्या जोरावरच खऱ्या अर्थाने सर्वसामान्य जनता सुजय विखे यांना पारनेर नगर विधानसभा मतदारसंघात आमदार केल्याशिवाय शांत बसणार नाही या ठिकाणी पक्ष संघटनेमध्ये असलेले एकीचे बळ दाखवून देण्यासाठी माजी खासदार सुजय विखे यांनी आता मतदारसंघातून आमदारकीला उमेदवारी करणे गरजेचे आहे.

खऱ्या अर्थाने सर्वसामान्य कार्यकर्त्यांची व विखे समर्थकांची ही इच्छा असून सुजय विखे हे जर पारनेर नगर विधानसभा मतदारसंघात आमदार झाले तर लोकसभेला झालेला पराभव हा खऱ्या अर्थाने बदला ठरणार असलयाचे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सामान्यांचा आधारवड: आमदार अरुणकाका जगताप

अहिल्यानगर-  अरुणकाका आमदार अरुणकाका म्हणजे सामान्य जनतेचा आधारवड. गरिबांवरील अन्यायाच्या विरोधात उभा राहणारा, गरीब आणि...

हवामान खात्याचा इशारा आला! नगर जिल्ह्याला ‘इतक्या’ दिवसाचा यलो अलर्ट

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा अजूनही कायम असून, हवामान विभागाने पुढील...

निष्ठावंतांचं केडर जपणारे काका पुन्हा होणे नाही!

काका म्हणाले होते, ‌‘जनतेचे आशीर्वाद अन्‌‍ प्रेम मला मिळाले, सचिन आणि संग्रामला माझ्या दुप्पट...

भारतीय सैन्याने पाकिस्तानचा बुरखा फाडला; वाचा, स्पेशल रिपोर्ट

कर्नल सोफिया कुरेशी | पत्रकार परिषदेत महत्त्वपूर्ण माहिती Operation Sindoor: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी...