नवी दिल्ली । नगर सह्याद्री
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आयकरसंदर्भात मोठी घोषणा केली. यामुळे नवीन करप्रणाली निवडणाऱ्या नोकरदारांना फायदा होणार आहे. आता तीन लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर लागणार नाही. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आयकर स्लॅबमध्ये मोठे बदल जाहीर केले आहेत. आता नवीन करप्रणालीत स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा 50 हजार रुपयांवरून 75 हजार रुपये करण्यात आली आहे. मात्र जुन्या प्राप्तिकर प्रणालीत रिर्टन भरणाऱ्यांची निराशा अर्थमंत्र्यांनी केली. त्यांच्यासाठी करात सवलत देण्यात आलेली नाही.
अर्थमंत्र्यांनी जुन्या करातील मूळ सूट मर्यादेत वाढ केलेली नाही. कर दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यांना स्टँडर्ड डिडक्शनमध्ये वाढीचा लाभही मिळणार नाही.
जुन्या कर प्रणालीत असा लागणार कर
तीन लाखांपर्यंत काही नाही
तीन ते सात लाखांपर्यंत – 5टक्के कर
सात ते दहा लाख -10 टक्के कर
दहा ते बारा लाख – 15 टक्के कर
12 ते 15 लाख – 20 टक्के कर
15 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न – 30 टक्के कर
नव्या करप्रणालीनुसार कोणत्या उत किती रक्कम भरावी लागणार?
3 लाख रुपये- कोणताही कर नाही
3 लाख ते 7 लाख रुपये- 5 टक्के
7 लाख ते 10 लाख रुपये- 10 टक्के
10 लाख ते 12 लाख- 15 टक्के
12 लाख ते 15 लाख – 20 टक्के
15 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न- 30 टक्के