अहमदनगर। नगर सहयाद्री:-
बाळगोपाळ गोविंदा ‘बोल बजरंग बली की जय… ‘चा नारा देत थरावर थर रचत दहीहंडीचा उत्सव साजरा करत असतानाच कोरोनानंतर सेलिब्रिटींच्या उपस्थितीचा तडका देण्याचा ट्रेंड पुन्हा जोर धरू लागला आहे. त्यामुळे आता या उत्सवाला एका इव्हेंटचे स्वरूप प्राप्त झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
कलाकारांनी उपस्थित राहून गोविंदांचे मनोरंजन करावे, यासाठी काही मंडळे आजही लाखो रुपये खर्च करतात. अगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या दहीहंडी उत्सवात राजकीय पुढार्यांकडून शक्तिप्रदर्शन करण्याची जोरदार तयारी सुरु आहे.
प्रेरणा प्रतिष्ठान
ऐतिहासिक अहिल्यानगर मधील प्रेरणा प्रतिष्ठान व संग्राम भेय्या जगताप सोशल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विधामाने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक माळीवाडा येथे आयोजित केलेल्या दहीहंडीला सिने अभिनेत्री जिनिलिया देशमुख उपस्थित राहणारआहे.
श्रीयोग प्रतिष्ठान
अभिषेक कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीयोग प्रतिष्ठान यांनी आयॊजीत केलेल्या दहीहंडी उत्सवास सिने अभिनेत्री केतकी माटेगांवकर व सिने अभिनेत्री एली अवराम यांच्यासह सुप्रसिद्ध गायक अवधूत गांधी हे देखील उपिस्थत राहणार आहे.
भूमिपुत्र प्रतिष्ठान
आ. संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नेप्ती नाका येथील भूमिपुत्र प्रतिष्ठान यांनी आयोजित केलेलया दहीहंडी उत्सवास नाद प्रतिष्ठान यांचे स्थिर वादन तसेच हिंदू रणरागिणी हर्षाताई ठाकूर, कीर्तनकार ह. भ. प संग्राम बापु भंडारे उपिस्थत राहणार आहे.
संघर्ष प्रतिष्ठान
नगर-मनमाड महामार्गावरील संपत बारस्कर यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली संघर्ष प्रतिष्ठान यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवास सिने अभिनेत्री ईशा माळवे, रील स्टार प्रतीक्षा बनकर, सिने अभिनेत्री सोनाली सोनावणे, रील स्टार शोनाई इंगळे यांची उपिस्थत राहणार आहे. तसेच तालयोगी वाद्यपथक याचे स्थिर वंदन होणार आहे.
जगदंबा तरुण मंडळ व शिवमुद्रा ग्रुप (केडगाव)
नगरसेवक मनोज कोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली जगदंबा तरुण मंडळ व शिवमुद्रा ग्रुप (केडगाव) यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवास सिने अभिनेत्री तेजश्री प्रधान उपिस्थत राहणार आहे.
अजिंक्य युवा प्रतिष्ठान
नगरसेवक अजिंक्य बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अजिंक्य युवा प्रतिष्ठान यांनी आयॊजीत केलेल्या दहीहंडी उत्सवास सिने अभिनेत्री केरला स्टोरी अदा शर्मा यांची उपिस्थत राहणार असून नागरिकांनी दहीहंडी उत्सवास उपिस्थत राहावे असे आवाहन नगर शहरातील दहीहंडी उत्सव समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे.