अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील अष्टविनायक पैकी एक तीर्थक्षेत्र असणाऱ्या सिद्धटेक येथे गणपती मंदिराच्या प्रवेशद्वारा जवळ अनाधिकृत थडगे उभारण्यात आले होते. अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप, राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांच्या उपस्थितीमध्ये सकल हिंदू संघटनेच्या युवकांनी हे वादग्रस्त थडगे जमीन दोस्त केले. यावेळी जोरदार घोषणाबाजी देण्यात आले. प्रचंड मोठ्या संख्येने युवक यावेळी उपस्थित होते. मोठा पोलीस बंदोबस्त देखील यावेळी ठेवण्यात आला होता.
कर्जत तालुक्यातील सिद्धटेक येथील सिद्धिविनायक मंदिराच्या महाप्रवेशद्वाराच्या जवळच अनाधिकृत थडगे बांधण्यात आले होते. या थडग्याला कोणताही कायद्याचा आधार न घेता काही लोक प्रशासनाला वेठीस धरत होते. या बेकायदेशीर थडग्यामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या जात आहे. यामुळे ते तात्काळ त्या ठिकाणाहून हटवावे अशी मागणी सकल हिंदूच्या वतीने जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासन यांच्याकडे पत्रव्यवहार करून करण्यात आली होती.
मागणी करूनही प्रशासन याबाबत कारवाई करत नसल्यामुळे अखेर दिनांक 16 जून रोजी दुपारी तीन वाजताआमदार संग्राम जगताप व सागर बेग हे सिद्धटेक येथे या वादग्रस्त थडगे असलेल्या ठिकाणी भेट देणार होते. यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी ठेवण्यात आला होता.
संग्राम जगताप यांची सर्वप्रथम कर्जत शहरांमधून भव्य रॅली काढण्यात आली. यानंतर ग्रामदैवत गोदड महाराज यांचे दर्शन घेऊन हि रॅली थेट सिद्धटेक येथे पोहोचले. त्या ठिकाणी पोहचल्यावर युवकांनी ते वादग्रस्त थडगे जमीन दोस्त करण्यात आले. यानंतर कर्जत येथील कापरेवाडी वेस येथे असणाऱ्या मारुती मंदिराच्या ठिकाणी महाआरती करण्यात आली.
‘ज्या ठिकाणी येईल आली तेथे येईल बजरंग बली’
सिद्धटेक येथील वादग्रस्त थडगे काढावे अशी मागणी सकल हिंदू समाज यांच्यावतीने प्रशासनाकडे करण्यात आली होती. मंदिराच्या प्रवेशद्वारातच हे अनाधिकृत बांधकाम असल्यामुळे हिंदू धर्मांच्या भावना दुखावल्या जात होत्या. प्रशासनाने या वादग्रस्त थडग्याचा काही भाग काढला होता मात्र आज युवकांनी हे संपूर्ण थडगे जमीन दोस्त केले आहे. यापुढील काळामध्ये अशा पद्धतीने हिंदू मंदिरांच्या प्रांगणामध्ये वादग्रस्त गोष्टी आम्ही सहन करणार नाही व आता ज्या ज्या ठिकाणी आली दिसेल त्या ठिकाणी बजरंग बलीच्या रूपाने आमचे हिंदू बांधव उभे राहतील.
तगडा पोलिस बंदोबस्त
सिद्धटेक येथे गणपती मंदिराबाहेर असलेल्या त्या विवादित जागेवरून कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रस निर्माण होऊ नये यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना देखील कोणताही त्रास होऊ नये याची देखील यावेळी दक्षता घेण्यात आली