Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारची ‘लाडकी बहीण योजना’ सध्या चर्चेचा विषय बनली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळतात, आणि याआधी महायुती सरकारने या रकमेची वाढ करून २१०० रुपये करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्यामुळं महिलांच्या मनामध्ये आता हे २१०० रुपये कधी मिळणार, याबाबत उत्सुकता आहे.
आता, लाडकी बहीण योजनेतून जवळपास ५ लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत, ज्यामुळे त्या महिलांना पुढील काळात पैसे मिळणार नाहीत. त्यामुळं, फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची तारीख सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. महिलांना अपेक्षेप्रमाणे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लवकरच मिळेल. तरीही, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
मात्र, मागील ३ महिन्यांमध्ये हप्ता दर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात देण्यात आलेला आहे. त्यामुळे यावेळीही फेब्रुवारी महिन्याच्या २५ तारखेला हप्ता मिळण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी महिना २८ दिवसांचा असल्याने, २५ तारखेला हप्ता महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. या महिन्यातही हप्ता २८ तारखेच्या अगोदर ४-५ दिवसांच्या आत वितरित होऊ शकतो.