Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी खास मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. लाडकी बहीण योजनेत सध्या तरी १५०० रुपये मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेत २१०० रुपये देण्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते. दरम्यान, विधानसभा निवडणुका होऊन दोन महिने झाले आहेत. अद्याप लाडकी बहीण योजनेतील २१०० रुपयांबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.महायुतीच्या अनेक नेत्यांनी अर्थसंकल्पानंतर महिलांना २१०० रुपये मिळणार असल्याचे सांगितले होते. मात्र, अजूनही याबाबत माहिती देण्यात आलेली नाही.
राज्याचे अर्थसंकल्प कधी सादर होणार, महिलांना पैसे कधी मिळणार, असे अनेक प्रश्न अनेक महिलांना पडले आहेत. लाडकी बहीण योजनेतील वाढीव हप्त्याची वाट महिला बघत आहे. राज्याच्या अर्थसंकल्पानंतर हे पैसे मिळू शकतात. राज्याचे अर्थसंकल्प ३ मार्च रोजी सादर होऊ शकतो. याबाबत अजित पवारांनी माहिती दिली होती. दरवर्षी १ मार्च रोजी अर्थसंकल्प सादर केले जाते. अर्थमंत्री अजित पवार यावर्षी राज्याचे अर्थसंकल्प सादर करतील.
अर्थसंकल्पात सर्वसामान्यांसाठी अनेक घोषणा होऊ शकतात. यात लाडकी बहीण योजनेबाबतही मोठी घोषणा केली जाऊ शकते. लाडकी बहीण योजनेत महिलांना २१०० रुपये देण्याचा निर्णय होऊ शकतो. महिला व बालविकास विभागाने अर्थमंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवल्यानंतर यावर निर्णय घेतला, असं सांगण्यात येत आहे. लाडकी बहीण योजनेबाबत अनेक प्रश्न विचारले जात आहे. लाडकी बहीण योजना बंद असल्याच्या चर्चा होत आहेत. मात्र, या चर्चांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पूर्णविराम दिला आहे. लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही, उलट आम्ही महिलांना अधिक मदत करण्याचा प्रयत्न करु, असं त्यांनी सांगितलं.