मुंबई। नगर सहयाद्री :-
महाराष्ट्र विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपने महायुतीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युलाचा जाहीर निर्णय अद्याप केला नाही. तथापि, भाजपची पहिली उमेदवार यादी नवरात्रोत्सवाच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. भाजपने १६० जागांसाठी आग्रही असल्याची माहिती समोर आली आहे.
आगामी १५ दिवसांत भाजपच्या किमान ५० उमेदवारांना वैयक्तिक निरोप दिला जाऊ शकतो. ३ ऑक्टोबरनंतर भाजपची पहिली यादी जाहीर होईल, असे संकेत अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यातून मिळाले आहेत. ८ सप्टेंबर रोजी रात्री अमित शाह यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपच्या नऊ प्रमुख नेत्यांची बैठक घेतली.
बंडखोरीच्या संभावनांचा विचार करून, उमेदवारांना थेट निरोप देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. भाजपचे विद्यमान १०२ आमदार असल्यानामुळे अधिक जागा भाजपला मिळण्याची शक्यता आहे. पहिल्या यादीत ५० उमेदवारांची नावे असू शकतात. तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन निवडणुकीला सामोरे जाण्याचे अमित शाहांनी स्पष्ट केले आहे, ज्यामुळे इतर चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.