spot_img
महाराष्ट्रलाडक्या बहि‍णींना मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार? महत्त्वाची अपडेट समोर

लाडक्या बहि‍णींना मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार? महत्त्वाची अपडेट समोर

spot_img

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा लाखो महिलांना लागून आहे. या योजनेतून पात्र महिलांच्या खात्यात दरमहा १५०० रुपये जमा केले जातात. मात्र, मे महिन्याचा हप्ता अद्याप जमा झालेला नाही. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी ३.३७ कोटी रुपयांच्या फाईलवर सही केल्यामुळे लवकरच या रकमेतून महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे. मागील महिन्यांप्रमाणेच याही वेळेस हप्ता महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जमा होऊ शकतो.

मे महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. त्यामुळे या काळात १५०० रुपये जमा होतील. जर तुम्हाला पैसे मिळाले नाही तर पुढच्या महिन्यात पैसे जमा केले जाऊ शकतात. लाडक्या बहिणींना जर या महिन्यात पैसे दिले नाहीत तर पुढच्या महिन्यात महिलांच्या खात्यात ३००० रुपये जमा होतील. लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांची पुन्हा पडताळणी सुरु झाली आहे.

दरम्यान, या योजनेत निकषांबाहेर जाऊन अर्ज करणाऱ्या महिलांना आता फटका बसणार आहे. या महिलांचे अर्ज बाद केले जाणार आहेत. लाडकी बहीण योजनेतील महिलांच्या नावाने फसवणूकदेखील होत आहे. त्यामुळे या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पडताळणी पुन्हा सुरु करण्यात आली आहे. यातून या महिन्यात अनेक महिला बाद होण्याची शक्यता आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रकार! एका कारणामुळं शिक्षिकेची पदोन्नती रद्द; नेमकं काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एका महिला...

पारनेर तालुक्यात पिकांचा बनावट पंचनामा; सखोल चौकशीची मागणी

पिंपरी पठार, वेसदऱ्यात लाभार्थ्यांची बोगस यादी: सरपंच शिंदे पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर तालुक्यातील पिंपरी...

राज-उद्धव ठाकरेंच्या युतीचं अखेर ठरलं, जागावाटपाबाबत मोठी माहिती समोर!

मुंबई / नगर सह्याद्री : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात मनसेचे आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यात...

सरपंच संजय रोकडे यांची आक्रमक भूमिका; ग्रामस्थांसह ‘या’ कामांसाठी करणार उपोषण..

पारनेर । नगर सहयाद्री:- वडगाव सावताळ ते गाजदिपूर या गावांना जोडणाऱ्या रस्त्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी...