मुंबई। नगर सहयाद्री-
बोर्डाच्या वतीने बारावीचा निकाल 21 मे रोजी जाहीर करण्यात आला आहे. आता दहावीच्या निकालाची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा लागली आहे. पालकांच्या देखील नजरा दहावीच्या निकालाकडे लागल्या आहे. त्यातच शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दहावीचा निकाला संदर्भात मोठी माहिती दिली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीची परीक्षा 1 मार्च ते 6 मार्च दरम्यान आयोजित करण्यात आली होती. आता विद्यार्थ्यांना निकालाची उत्सुकता लागून राहिलेली आहे. महाराष्ट्रातील जवळपास 16 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीचा निकाल लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दहावीचा निकाल 27 मे पर्यंत जाहीर होईल असं म्हटलं आहे.दहावीचा निकाल येत्या काही दिवसांमध्ये जाहीर होणार असल्याने विद्यार्थी आणि पालक निकालासाठी आतूर झाले आहेत.