Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना चांगलीच चर्चेत आली आहे. लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत महिलांना ७ हप्ते देण्यात आले आहेत. आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लवकरच देण्यात येणार आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना २१०० रुपये देण्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते. दरम्यान, अर्थसंकल्पानंतर हे पैसे दिले जातील, असं सांगण्यात येत आहे.
लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारी महिन्यात महिलांना १५०० रुपये मिळणार की २१०० रुपये याबाबत महिलांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत. लाडकी बहीण योजनेच्या २१०० रुपयांबाबत प्रश्न संभ्रम निर्माण झाला आहे. लाडकी बहीण योजनेबाबत राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळतील, असं त्यांनी सांगितलं होतं.
लाडकी बहीण योजनेत महिलांना अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर २१०० रुपये मिळतील, असं वक्तव्य अनेक नेत्यांनी केलं आहे. दरम्यान, अजूनही बालविकास विभागाने वाढीव रक्कमेबाबत कोणतीही शिफारस अर्थ मंत्रालयाकडे केली नसल्याचे समोर आले आहे. शिफारस केल्यानंतर जवळपास ४ महिन्यांनी अंबलबजावणी होते, असंही सांगितलं आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना मार्च महिन्याच्या अर्थसंकल्पामध्ये तरी २१०० रुपये मिळण्याचा निर्णय होणार का याबाबत संभ्रमच आहे.