spot_img
ब्रेकिंगलाडक्या बहीणींना २१०० रुपये कधी मिळणार?; मंत्री विखे पाटलांनी दिली माहिती..

लाडक्या बहीणींना २१०० रुपये कधी मिळणार?; मंत्री विखे पाटलांनी दिली माहिती..

spot_img

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ महायुती सरकारसाठी विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरली. या योजनेत पात्र ठरणाऱ्या 21 ते 65 वयोगटातीस महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात. आतापर्यंत या योजनेचे सहा हप्ते महिलांना मिळाले आहे. तर आता 2100 रूपये कधी मिळणार अशी आशा अनेक महिलांना लागली आहे. यातच राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबत महत्वपूर्ण माहिती दिली आहे.

नेवासा येथे आमदार विठ्ठलराव लंघे यांनी आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्यात विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठे वक्तव्य केले. मार्च महिन्यानंतरच लाडक्या बहिणींचा हप्ता 1500 रुपयांवरून 2100 रुपये होईल. अर्थ संकल्पीय अधिवेशनानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळतील,असं वक्तव्य जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं.

दरम्यान, लाडक्या बहिणींचा हप्ता 1500 रुपयांवरुन 2100 रुपये करू, असे आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दिले होते. मात्र आता आश्वासनाची पूर्तता कधी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता त्याच पार्श्वभूमीवर राधाकृष्ण विखे पाटील यांनी मार्च महिन्यानंतर हे पैसे मिळतील असे विधान केल्याने चर्चांना उधाण आले आहे. यातच आता ३ मार्च रोजी राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेचा समावेश असेल, असे म्हटले जात आहे.

यावेळी राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेस आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. लोकसभेवेळी राहुल गांधी यांनी प्रत्येक महिलेला 6 महिन्यात खटाखट पैसे देऊ असे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप ते दिले नाही, अशीच खोटी आश्वासने ते देत असतात. यामुळेच त्यांना जनतेनं नाकारलं आहे पण आम्ही आमचं सरकार आल्यावर खटाखट नाही तर पटापट पैसे देऊ असे म्हटले होते. ते आम्ही पटापट दिले. आमचे सरकार खटाखट नाही तर पटापट देणारं आहे, अशीही टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसवर केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता कशासाठी थांबायचे?; पक्ष सोडण्यावर नगरसेवक, पदाधिकारी ठाम

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- विधानसभा निवडणुकीवेळी वारंवार मागणी करूनही पक्षाच्या वरिष्ठांनी, नेतृत्वाने आमची दाखल घेतली...

गरीब विक्रेत्यांना लक्ष्य करू नका; खा. नीलेश लंके यांचा इशारा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- शहरात महानगरपालिका अतिक्रमण मोहीम राबवत असून, रस्त्याच्या कडेला फळविक्री करणारे, हातगाडीवाले,...

निकृष्ट काम खपवून घेतले जाणार नाही; आमदार दातेंचा ठेकेदाराला इशारा

पारनेर | नगर सह्याद्री:- पारनेर जामगांव रस्त्याचे चालू असलेले काम अत्यंत संथ गतीने व निकृष्ट...

दिल्ली विधानसभेचा बिगुल वाजला; ५ फेब्रुवारीला मतदान अन निकाल…

निवडणूक आयुक्तांची घोषणा नवी दिल्ली / वृत्तसंस्था : नव्या वर्षात दिल्लीत निवडणूक होते आहे. दिल्लीत...