Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारीच्या हप्त्याची वाट महिला बघत आहेत. १५०० रुपये कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे. फेब्रुवारी महिना हा २८ दिवसांचा आहे. महिना संपायला अवघे ४ दिवस बाकी आहेत परंतु अजुनही या हप्त्याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहे.
लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा अर्जांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर देणार आहेत,असं सांगण्यात येत होते. दरम्यान, अजूनही अर्जांची पडताळणी पूर्ण झालेली नाही का असा प्रश्न विचारला जात आहे. महिना संपायला अवघे ४ दिवस उरले असूनही पैसे खात्यात जमा झालेले नाही. महिलांच्या अर्जांची पडताळणी होण्यासाठी अजून किती दिवस लागणार? फेब्रुवारी महिन्यात पडताळणी पूर्ण झाली नाही तर हा हप्ता पुढे दिला जाऊ शकतो.
लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत लाखो महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहे. या महिलांना फेब्रुवारीपासून पैसे मिळणार नाहीत. या योजनेच्या अर्जांची पडताळणी फेब्रुवारी महिन्यात पूर्ण होणार का? जर पडताळणी पूर्ण झाली नाही तर हप्ता मार्च महिन्यात मिळणार का असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. त्यामुळे आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मार्च महिन्यात देणार का असा विचार महिलांच्या मनात येत आहे.
होळीपूर्वी मिळणार खास भेटवस्तू
महायुती सरकारकडून महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली. निवडणुकांमध्ये देखील या योजनेवरुन जोरदार प्रचार झाला. राज्यातील निवडणुकांच्या प्रचारामध्ये महिलांवर आधारित प्रचार करण्यात आला. यामध्ये आता महिलांसाठी महायुती सरकारने आणखी एक भेटवस्तू देण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच होळीचा सण साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने लाडक्या बहिणींसा साडी भेट देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे.साडी देण्याचा निर्णय झाल्यानंतर राज्य यंत्रमाग महामंडळाद्वारे अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांच्या यादीनुसार साड्यांचे गठ्ठे तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक तालुक्यातील रेशन दुकानात साड्या पोहोचवण्यात येणार आहेत. होळीपर्यंत प्रत्येक लाभार्थी कुटुंबांना एक साडी दिली जाणार आहे.