spot_img
अहमदनगरविहिरीतलं पाणी संपलं की महत्त्वं समजत, वीज गेल्यानंतर...;आमदार थोरात नेमकं म्हणाले तरी...

विहिरीतलं पाणी संपलं की महत्त्वं समजत, वीज गेल्यानंतर…;आमदार थोरात नेमकं म्हणाले तरी काय? पहा..

spot_img

संगमनेर । नगर सहयाद्री:-
विहिरीतलं पाणी संपलं की आपल्याला पाण्याचे महत्त्वं समजते, वीज गेल्यानंतर वीजेचे महत्त्व समजते. प्रकृतीने आपल्याला अशाकाही गोष्टी दिल्या आहेत की ज्या नसल्या की त्याचे महत्त्व आपल्याला समजते. जागतिक तापमानवाढीच्या कारणाने आज आपल्याला झाडांचे महत्त्व समजायला लागले आहे. दंडकारण्य अभियानाच्या माध्यमातून गेल्या दोन दशकांपासून आपण पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करीत असताना उद्योजक मनीष मालपाणी यांनी हरित वसुंधरेचे स्वप्न मनात बाळगून दरवर्षीच्या वाढदिवसाला एखादी ओसाड टेकडी हरित करण्याचा त्यांचा संकल्प भविष्यात जगासाठी पथदर्शी ठरेल असे गौरोद्गार माजीमंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढलेे.

संगमनेरचे उद्योजक मनीष मालपाणी यांच्या वाढदिवसा निमित्ताने धांदरफळ शिवारातील कारेश्‍वर टेकडीवर 51 हजार वृक्ष लागवडीच्या संकल्पपूर्ती सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी माजी आ. डॉ.सुधीर तांबे, सुवर्णा मालपाणी, माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, जयश्री थोरात, राजेश मालपाणी, डॉ.संजय, गिरीश व आशिष मालपाणी, रचना मालपाणी, सागर केदारे, संदीप पाटील, रामहरी कातोरे, सरपंच उज्ज्वला देशमाने, स्वदेश सेवाभावी संस्थेचे संस्थापक बाळासाहेब देशमाने आदी उपस्थित होते.

आमदार थोरात म्हणाले की, काही दिवसांपूर्वीच केरळमधील वायनाडमध्ये पावसामुळे उडालेला हाहाकार आपण सर्वांनी बघितला. खरेतर पश्‍चिमघाट पर्यावरण समितीने आपल्या अहवालात या सगळ्या गोष्टींकडे शासनाचे व नागरिकांचे लक्ष वेधले होते. मात्र आपण त्याकडे गांभीर्याने बघितले नाही, त्याचा परिणाम माळीण, तळई सारख्या दुर्घटनांचा आपल्याला सामना करावा लागला. निसर्ग आपल्याला सावरण्याची संधी देतो, मात्र ती डावलून जेव्हा आपण त्याला उध्वस्थ करण्याचे काम करतो तेव्हा काय घडते हेच या घटनांमधून दिसून आल्याचा दाखलाही त्यांनी यावेळी उपस्थितांना दिला. उद्योजक मनीष मालपाणी यांनी दोन दशकांपूर्वी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या दंडकारण्य अभियानात मालपाणी उद्योग समूहाने खांडेश्‍वर डोंगरांवर केलेल्या बीजरोपणाच्या आठवणींना उजाळा दिला.

तेव्हापासून दरवर्षीच्या वाढदिवसाला दोनशे-तिनशे झाडे लावण्याचा उपक्रमही राबवला, मात्र तो खूपच तोकडा असल्याचे लक्षात आल्यानंतर खांडेश्‍वराच्या त्याच डोंगरावर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणासह त्यांच्या संगोपनासाठी ठिबक सिंचनाची व्यवस्था केल्याने कधीकाळी ओसाड वाटणारी ही टेकडी आज वनराईत परावर्तीत झाल्याचा दाखला त्यांनी दिला.भगवद्गीतेत भगवंत पान, फुल, फळ व पाणी अर्पण केले तरीही आपण तृप्त होतो असे म्हणतात, त्यांच्या या संदेशाकडे गांभीर्याने बघितल्यास साक्षात भगवंतानेच गीतेतून आपल्याला वृक्षारोपणाचा संदेश दिल्याचे जाणवते. मात्र कालानुरुपे आपणच त्यात सोयीनुसार बदल केल्याचे मालपाणी म्हणाले. खरेतर, सध्या अखंड हरिनाम सप्ताहाचा हंगाम सुरु आहे. राज्यातील सर्व कीर्तनकारांनी आपल्या कीर्तनातून भगवंताचा हाच संदेश जनमनापर्यंत पोहोचवला तर ही चळवळ अधिक व्यापक होईल असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्तविक केले, दत्ता कासार यांनी सूत्रसंचालन तर, उद्योजक भाऊसाहेब डेरे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला संगमनेर व धांदरफळ पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देवाचा डोंगर वनराईने नटला
वृक्षमित्र अशी ओळख असलेले उद्योजक मनीष मालपाणी आपल्या प्रत्येक वाढदिवसाला संगमनेर परिसरातील एका ठिकाणाची निवड करुन तेथे मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड व त्याच्या संवर्धनाचा उपक्रम राबवतात. त्यासाठी त्यांच्या पत्नी रचना मालपाणी यांनी ‘रोप बँक’ तयार केली असून आजवर सात लाखांहून अधिक रोपांचे विनामूल्य वितरणही करण्यात आले आहे. मालपाणी यांच्या प्रयत्नातून तालुक्यातील कपारेश्‍वर, सायखिंडी व वेल्हाळे येथील देवाचा डोंगर विविध प्रकारच्या वनराईने नटला आहे, त्यात आता कारेश्‍वर टेकडीचाही समावेश झाला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरमध्ये लाचलुचपत विभागाची मोठी कारवाई; कोण अडकलं जाळ्यात, वाचा सविस्तर

अव्वल कारकून चार लाखांच्या लाचेच्या जाळ्यात अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- रस्त्याच्या कामाची तांत्रिक मान्यता देण्यासाठी...

शिवसेनेला 32 आजी-माजी नगरसेवकांचा जय महाराष्ट्र! भाजपा-एकनाथ शिंदे सेना यापैकी एक पर्याय निवडला जाणार

जनाधार नसलेल्यांच्या आरोपांनी वैतागले पदाधिकारी | गुप्त बैठकीत झाला निर्णय | भाजपा-एकनाथ शिंदे सेना...

राज्यात कुठे-कुठे फेरमतमोजणी? निवडणुक आयोगाकडून कुणाला मिळाला दिलासा…

नाशिक | नगर सह्याद्री:- राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले आहे. मात्र विरोधकांकडून ईव्हीएम...

अहिल्यानगर: बसस्थानक परिसरातील अतिक्रमणांवर हातोडा! कापड बाजारातील अतिक्रमण हटणार का?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नगर शहरातील माळीवाडा बसस्थानक व पुणे बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात झालेल्या...