spot_img
ब्रेकिंगशहरात चाललंय काय? भर रस्त्यात कोयत्याने सपासप वार; सात जणांविरोधात गुन्हा दाखल

शहरात चाललंय काय? भर रस्त्यात कोयत्याने सपासप वार; सात जणांविरोधात गुन्हा दाखल

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री
मित्राला झालेली मारहाण सोडवण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यावर कोयत्याने सपासप वार केल्याची प्रकार घडला. या प्रकरणी सात जणांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सात जणांच्या टोळक्याने रविवार दि. ५ ऑक्टोबर रोजी दुपारी शहरातील तपोवन रोड परिसरात धुडगुस घातला. जखमी सक्षम नवघरे (रा. भुषण नगर, केडगाव) हा चास येथील महाविद्यालयात कॉम्प्युटर डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे.

त्याच्या फिर्यादीनुसार, त्याचा मित्र नयन खेचे याला पडका महाल परिसरात काही जणांनी मारहाण केली होती. याची माहिती मिळताच सक्षम त्याच्या मदतीसाठी घटनास्थळी गेला. मात्र नयनला गाडीत बसवून नेत असताना आरोपींनी त्यांच्या दुचाकीचा मार्ग अडवून सक्षमवर कोयता व लोखंडी रॉडने हल्ला चढवला. ‘तुला आज जिवंत सोडणार नाही’ असे म्हणत जॉय सोनवणेने कोयत्याने, अनुज बोरुडेने लोखंडी रॉडने, तर इतरांनी मारहाण केली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी जॉय सोनवणे, अनुज बोरुडे, जॅकी उर्फ धीरज, साहिल दरेकर, अमन वाबळे, पिंट्या बकासुर आणि भोऱ्या (सर्व रा. पवन नगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कोतवाली पोलीस करत असून आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अमित शहांना पुन्हा भावले विखे पाटलांचे संघटनकौशल्य! किंगमेकरच्या भूमिकेत विखे परिवार

किंगमेकरच्या भूमिकेत विखे परिवार | युवा नेते डॉ. सुजय विखे पाटील यांच्या संघटन कौशल्यासह...

महापुरुषांचा अपमान, सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न; आरोपींला अटक करण्याची मागणी

अहिल्यानगरमध्ये अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरातील इम्पेरियल चौक परिसरात एका अज्ञात इसमाने महापुरुषांविषयी...

पारनेर तालुक्यात खळबळ! वृद्ध शेतकऱ्याला 50 लाखांचा गंडा; नेमकं काय घडलं?

जमीन खरेदी व्यवहार फसवणूक; चौघांविरुद्ध गुन्हा अहिल्यानगर | नगर सह्याद्री पारनेर तालुक्यातील एका 63 वषय शेतकऱ्याची...

पंचायत समिती: नगर, पारनेर,श्रीगोंद्यात सर्वसाधारण महिला

राहाता, जामखेड ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षित अहिल्यानगर | नगर सह्याद्री जिल्ह्यातील 13 पंचायत समिती सभापतीपदाच्या आरक्षणाची...